शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

फलकाला लटकविले जातात ग्राहकांचे वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:51 IST

प्रत्येक ग्राहकाच्या घरी वेळेवर वीज बिल नेऊन देणे हे वीज बिल वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. मात्र एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये एखाद्या दुकानात, गावातील फलकाला संपूर्ण गावाचे वीज बिल लटकविले जातात.

ठळक मुद्देनेंडेर येथील प्रकार : महावितरणचे दुर्लक्ष, बिल वितरकावर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : प्रत्येक ग्राहकाच्या घरी वेळेवर वीज बिल नेऊन देणे हे वीज बिल वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. मात्र एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये एखाद्या दुकानात, गावातील फलकाला संपूर्ण गावाचे वीज बिल लटकविले जातात. असाच प्रकार एटापल्ली-गट्टा मार्गावरील नेंडेर गावात उघडकीस आला आहे. संबंधित वीज बिल वितरण करणाºयावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.वीज बिल वसुलीबाबत महावितरणने अतिशय कडक धोरण अवलंबिले आहे. एक महिन्याचे जरी वीज बिल थकले तरी संबंधित वीज ग्राहकाचा वीज पुरवठा खंडीत केला जातो. महावितरणने वीज बिल भरण्यात सुलभता आणण्यासाठी एसएमएस सुविधा, अ‍ॅपचा वापर सुरू केला आहे. मात्र या सर्व सुविधांसाठी मोबाईल कव्हरेज व इंटरनेटची सुविधा असणे आवश्यक आहे. एटापल्ली तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मात्र मोबाईल व इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. अशा गावांमध्ये महावितरणची आधुनिक साधने बेकामी आहेत. या ग्राहकांना अजुनही जेव्हा वीज बिल प्राप्त होते, तेव्हाच आपले बिल किती आले, हे कळते व हेच बिल धरून ते संबंधित बँकेत जातात.दुर्गम भागातील नागरिकांना वीज बिल मिळणे अतिशय आवश्यक आहे. वीज बिल वितरणाचे काम महावितरण एखाद्या खासगी स्थानिक व्यक्तीला देते. वीज बिल वितरणासाठी प्रती बिल एक रुपया संबंधित व्यक्तीला दिला जातो. त्यामुळे वीज बिल घरोघरी नेऊन देणे ही संबंधित व्यक्तीचे कर्तव्य आहे. मात्र दुर्गम भागातील आदिवासी नागरिक सहजासहजी कुणाची तक्रार करीत नाही.याचा गैरफायदा वीज बिल वितरण करणाऱ्यांकडून घेतला जात आहे. नेंडेर गावातील नागरिकांचे वीज बिल रस्त्याच्या बाजुला असलेल्या खांबाला लटकवून संबंधित व्यक्ती पसार झाला. गावातील नागरिक स्वत:चे बिल शोधत होते.बिल हरविल्यास जबाबदार कोण?वीज बिल प्राप्त झाल्याशिवाय दुर्गम भागातील नागरिक वीज भरू शकत नाही. अशातच वादळ, वारा, पाऊस यामुळे वीज बिल उडून गेल्यास किंवा एखाद्या व्यक्तीने वीज बिल जाणून बुजून फेकून दिल्यास ग्राहकाला वीज बिल उपलब्ध होणार नाही. अशावेळी वीज बिल भरयाचा कसा, असा प्रश्न निर्माण होतो. वीज बिल भरले नाही म्हणून महावितरणचे कर्मचारी वीज पुरवठा खंडीत करतात. ग्राहकाची चुकी नसतानाही त्याचा वीज पुरवठा खंडीत होतो. कामचुकारपणा करणाºया वीज बिल वितरकावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :electricityवीज