आष्टी : चंद्रपूरवरुन आलापल्लीकडे जात असताना सायकलस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात कार वैनगंगा नदीच्या पुलाखाली कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास आष्टी येथे घडली. या अपघातात विक्की गड्डमवार व अंकुश गांगुलवार दोघेही रा.मुल जि. चंद्रपूर हे जखमी झाले. सोमवारी सकाळी विक्की गड्डमवार व अंकुश गांगुलवार हे एम.एच.३४-एएम०३१५ या कारने चंद्रपूरवरुन आलापल्लीकडे जाण्यास निघाले. आष्टीनजीक येताच वैनगंगा नदीच्या पुलावर एका सायकलस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट पुलाखाली पडली. यात विक्की व अंकुश जखमी झाले. विक्की गड्डमवार हा कार चालवत असल्याने त्याला जबर दुखापत झाली असून तो गंभीर आहे. दोन्ही जखमींना चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यापूर्वीही या पुलावरून वाहन पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. या घटनेचा अधिक तपास आष्टी पोलीस करीत आहे. (प्रतिनिधी)
आष्टीत वैनगंगा नदीच्या पुलावरुन कोसळली कार
By admin | Updated: June 30, 2015 02:16 IST