शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मका पिकाचे लागवड क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:46 IST

तृणधान्य पिकांमध्ये गहू, धान, पिकानंतर मक्याचा समावेश होतो. पाण्याची उपलब्धता, हवामान यानुसार सदर पिके घेतली जातात. परंतु भिन्न हवामानाशी जलद समरस होण्याची क्षमता असलेल्या मका पिकाकडे जिल्ह्यातील शेतकरी वळला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा कल बदलला : जिल्ह्यातील मक्याला मध्यप्रदेशात मागणी

ऑनलाईन लोकमतवैरागड : तृणधान्य पिकांमध्ये गहू, धान, पिकानंतर मक्याचा समावेश होतो. पाण्याची उपलब्धता, हवामान यानुसार सदर पिके घेतली जातात. परंतु भिन्न हवामानाशी जलद समरस होण्याची क्षमता असलेल्या मका पिकाकडे जिल्ह्यातील शेतकरी वळला आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात मका पिकाचे क्षेत्र वाढले आहे. कुरखेडा तालुक्यातील मिरची लागवड करणारे शेतकरी आता मका लागवडीकडे वळले आहेत.कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथे मिरचीची लागवड पूर्वी केली जायची. येथील मिरची विदर्भात प्रसिद्ध होती. परंतु मिरची पिकासाठी मोठी बाजारपेठ तसेच मिरची लागवड खर्च, ढगाळ वातावरणाचा होणारा वाईट परिणाम, कीटकनाशकांचा खर्च यासह विविध कारणांमुळे मिरची लागवडीचे क्षेत्र झपाट्याने घटले. कुरखेडासह कोरची, आरमोरी तालुक्यातील अनेक शेतकरी मका पिकाच्या लागवडीकडे वळले आहेत. अत्यंत कमी लागवड खर्च यामुळे मक्याची शेती शेतकऱ्यांना फायद्याची ठरत आहे. अन्नधान्य व्यतिरिक्त मक्याचा विविध कामांसाठी उपयोग होत असल्याने मक्याची मागणी वाढत असून कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथे मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. परिसरातील मका मध्यप्रदेशात पाठविला जात आहे. त्यामुळे मका हे उष्ण हवामानाला प्रतिसाद देणारे असले तरी या पिकाची लागवड शेतकरी रबी हंगामात करीत आहेत. सध्या मका पीक जोमात असून काही दिवसांपासून बाजारातही दाखल झाला आहे. यातून शेतकऱ्यांना बऱ्या प्रमाणात आर्थिक उत्पादन मिळत आहे.धान, मिरची व इतर पिकांपेक्षा कमी श्रमात अधिक उत्पादन मका पिकातून घेता येते. शेतीच्या बांधावरच व्यापारी येत असल्याने मक्याची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण जात नाही. मागील दोन वर्षांपासून आपण मक्याचे पीक घेत असून मक्याची शेती धान व मिरचीपेक्षा फायद्याची ठरत आहे.- गिरीधर दडमल, शेतकरी, उराडी, तालुका कुरखेडा