शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कृउबासचे विभाजन रखडले

By admin | Updated: November 4, 2014 22:39 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या १२ तालुक्यासाठी केवळ चार कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. आणखी दोन नव्या बाजार समित्या निर्माण कराव्यात, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी करीत आहेत.

शेतकरी अडचणीत : १२ तालुक्यांसाठी केवळ चार बाजार समित्यागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या १२ तालुक्यासाठी केवळ चार कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. आणखी दोन नव्या बाजार समित्या निर्माण कराव्यात, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी करीत आहेत. परंतु नव्या बाजार समित्यांच्या प्रस्तावावर तत्कालीन आघाडी सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.२६ आॅगस्ट १९८२ ला निर्माण झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी व अहेरी या चार ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. आरमोरी बाजार समितींतर्गत कोरची, कुरखेडा, देसाईगंज व आरमोरी या चार तालुक्यांचा कारभार आहे. गडचिरोली बाजार समिती अंतर्गत गडचिरोली, धानोरा या दोन तालुक्यांचा कारभार आहे. तर चामोर्शी व मुलचेरा या दोन तालुक्याचा कारभार चालतो. अहेरी उपविभागातील सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, अहेरी या चार तालुक्यासाठी अहेरी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. ज्या ठिकाणी बाजार समिती आहे. त्या ठिकाणापासून संलग्न तालुक्याचा अंतर हे दीडशे किमीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आरमोरी बाजार समितीचे विभाजन करून देसाईगंज व अहेरी बाजार समितीचे विभाजन करून सिरोंचा येथे नवी बाजार समिती निर्र्माण करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. आरमोरी येथील बाजार समितीच्या विभाजनाला आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन काँग्रेस आमदारांनी प्रचंड विरोध केला होता. त्यामुळे न्यायालयातही या संदर्भातील प्रकरण गेले होते. न्यायालयाने या प्रकरणी शासनाला काही दिशानिर्देशही दिले होते. आरमोरी बाजार समितीचा सर्व व्यापार हा देसाईगंजच्या भरवशावर चालतो. देसाईगंज येथे उपबाजारपेठ निर्माण करण्यात आली आहे. मात्र येथे आवश्यक सोयीसुविधांचा प्रचंड अभाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी लूट या ठिकाणी केली जात आहे. आरमोरी बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या कुरखेडा व कोरची तालुक्याला देसाईगंज हे जवळचे ठिकाण पडते. त्यामुळे देसाईगंज येथे नवी कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र शेतकऱ्यांच्या या मागणीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीने सिरोंचा येथे नवी बाजार समिती सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. याबाबत शासनाकडेही प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. तसेच गडचिरोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार यार्डातून चालतच नाही. गडचिरोली शहरातील काही ठरावीक व्यापाऱ्यांच्या घरीच शेतकऱ्यांच्या शेतमालाचे काटे केले जातात व मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा आर्थिक शोषण ही व्यापारी मंडळी करीत आहेत. सदर बाजार समितीला चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीसोबत संलग्न करावे, अशीही एक मागणी शेतकऱ्यांची आहे. शासनाने नव्या बाजार समितीच्या निर्मितीबाबत तत्काळ पाऊल उचलावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)