जि. प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची सभा : अशोक जयसिंगपुरे यांचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आवाहनगडचिरोली : ग्रामीण भागातील गरोदर मातांना शहरातील गरोदर मातांएवढेच अधिकार असून सुरक्षित प्रसूतीसाठी ग्रामीण भागात उपकेंद्राचे ठिकान न निवडता इतरत्र प्रसूती केली जाते. या कारणास्तव आरोग्य सेविकेला तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना वेठीस धरून त्यांचे मानसिक खच्चीकरण काही लोकांकडून केले जाते. अशा लोकांचा हा प्रयत्न, षड्यंत्र आरोग्य कर्मचाऱ्यांनी हाणून पाडावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे यांनी केले. स्थानिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्व. नामदेवराव पोरेड्डीवार सभागृहात आयोजित आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सभेला प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गौरकार, यवतमाळचे संजय राणे, डॉ. वासाळ, गडलिंग उपस्थित होते. उपकेंद्रातील लोकसंख्या जर पाच हजाराच्या वर असेल तर दोन आरोग्य सेविकांची नियुक्ती करावी, असा नियम असतानाही अशा ठिकाणी एक आरोग्य सेविका व आरोग्य सेवकावर जबाबदारी देऊन कर्मचाऱ्यांना त्रास दिला जातो, असेही जयसिंगपुरे म्हणाले. सभेला जिल्हाध्यक्ष सुरेंद्र खरवडे, अनिल मंगर, आशानंद सहारे, नीलू वानखेडे, आंबाने, सय्यद, पेंदाम, सोनटक्के, राजगडे, रणदिवे, फुलझेले, रंगुवार, भुरसे, कोटरंगे, भांडारकर, हुलके, कल्लूरी, लडके, गेडाम, सहारे, रायपुरे, अय्यर, पोरेटी, हेडो, वरखडे, शिंपी, बारसागडे, वनकर, डोळस, रामटेके, बोदले, पठाण, न्यालेवार, मशाखेत्री, खरबनकर, सोमनकर, अल्लीवार, वाटगुरे, सिडाम, वाढई, दरडमारे, देशमुख, कोरीवार, मेश्राम, चिलांगे, सातपुते, सोनुले, लाकडे, गजभिये, शेडमाके, नवघरे, जाधव, सेडमाके, बंडावार, रासेकर, बुरेवार, चन्नावार व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. संचालन विनोद सोनकुसरे तर आभार आनंद मोडक यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण हाणून पाडा
By admin | Updated: November 3, 2015 00:50 IST