शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय नेत्यांच्या दारावर गर्दी

By admin | Updated: August 27, 2014 23:29 IST

विधानसभेची निवडणूक आता तोंडावर आली आहे. याची आचारसंहिता आठवड्याच्या आत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची चांदी आहे. वर्गणीसाठी राजकीय

गडचिरोली : विधानसभेची निवडणूक आता तोंडावर आली आहे. याची आचारसंहिता आठवड्याच्या आत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची चांदी आहे. वर्गणीसाठी राजकीय पक्षनेत्यांच्या घराकडे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पावले वळू लागली आहेत. यंदा गडचिरोली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. दोन तालुके टंचाईग्रस्त जाहीर झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचा उत्साह अद्यापही कमी झालेला नाही. जिल्हाभर ४०० ते ४५० सार्वजनिक गणपती मांडले जातात. अनेक ठिकाणी या गणेशोत्सवासाठी मंडप डेकोरेशन, लायटिंग, डीजीटल बॅनर, आकर्षक गेटची उभारणी करताना गणेश मंडळाचे सदस्य व्यस्त आहेत. गणपतीच्या आगमनासाठी व विसर्जनासाठी बँड, डी. जे. चे बुकिंगही गणेश मंडळाकडून करण्यात येत आहे.यावर्षी गणेशोत्सव सुरू असताना निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवाला विधानसभा निवडणुकीची झालर राहणार आहे. अनेक नेते, पुढारी यानिमित्ताने अप्रत्यक्षपणे प्रचाराचा श्रीगणेशा करण्याचीही शक्यता आहे. या संधीचा लाभ घेऊन युवकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ते विविध क्लुप्त्या वापरण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवावर निवडणुकीची झालर असल्याने पोलिसांवर बंदोबस्ताचा प्रचंड ताण येणार आहे. दोन दिवसांवर गणेशोत्सव आला असल्याने मूर्तिकारांकडेही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची गर्दी झाली आहे. मूर्तिकार मूर्तीवर शेवटचा हात मारण्याच्या तयारीला लागले आहेत. यंदा गणेश मंडळांना मोठ्या प्रमाणावर वर्गणी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुका समोर ठेवून अनेक मंडळांनी आपल्या खर्चाचे नियोजनही वाढतीवर ठेवले आहे. अलीकडेच पार पडलेल्या पोळा सणात तान्हा पोळ्याला विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावून बक्षीस वितरण कार्यक्रम पार पाडले. (जिल्हा प्रतिनिधी)