शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

३२ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:46 IST

३१ मार्चपूर्वी पीक कर्ज भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना सेवा सहकारी संस्था तळोधीतर्फे २०१८ मधील खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वितरण करण्यात आले.

ठळक मुद्देजुने कर्ज भरून नवीन घेण्याचे आवाहन : तळोधी सेवा सहकारी संस्थेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (मो.) : ३१ मार्चपूर्वी पीक कर्ज भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना सेवा सहकारी संस्था तळोधीतर्फे २०१८ मधील खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वितरण करण्यात आले.यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, बँकेचे संचालक अमोल गण्यारपवार, वसुली विभागाचे सहायक व्यवस्थापक गिरीश नरड, कर्ज विभागाचे सहायक व्यवस्थापक एम.पी.दहिकर, सी.एम.तोटावार, सरपंच माधुरी सुरजागडे, सेवा सहकारी संस्था तळोधीचे अध्यक्ष मनोहर बोदलवार, उपाध्यक्ष नारायण कुकडे, सचिव डी.जे. चिंचोलकर आदी उपस्थित होते. ३२ सभासदांना ९ लाख ५ हजार रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार म्हणाले, ३१ मार्चपूर्वी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराचा लाभ दिला जातो. कर्ज भरल्यानंतर अगदी १५ दिवसांत शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध होत असल्याने बिनव्याजी पैसे वर्षभर वापरायला मिळतात. त्यामुळे पीक कर्ज शेतकºयांच्या हिताचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही, अशा शेतकऱ्यांना अजूनही मुदत असून त्यांनी कर्ज भरल्यानंतर तत्काळ कर्ज उपलब्ध करून दिले जाते. शेतकऱ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन केले. बँकेचे संचालक अमोल गण्यारपवार यांनी सुद्धा पीक कर्जाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. संचालन नेताजी अनपत्रावार, प्रास्ताविक मनोहर बोदलवार तर आभार सचिव बी.जे. चिंचोलकर यांनी मानले.