शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बोडी फुटल्याने पीक वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 23:53 IST

भामरागड तालुक्यात गुरूवारपासून सतत दमदार पाऊस होत असल्याने तलाव, बोड्यातील पाणीसाठा वाढला आहे. दरम्यान शुक्रवारी तालुक्यातील दुडेपल्ली येथील एका शेतकऱ्याची खासगी बोडी फुटल्याने परिसरातील धानपीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यामुळे २५ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपावसाने तलावात पाणीसाठा वाढला : दुडेपल्ली येथील २५ शेतकऱ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड तालुक्यात गुरूवारपासून सतत दमदार पाऊस होत असल्याने तलाव, बोड्यातील पाणीसाठा वाढला आहे. दरम्यान शुक्रवारी तालुक्यातील दुडेपल्ली येथील एका शेतकऱ्याची खासगी बोडी फुटल्याने परिसरातील धानपीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यामुळे २५ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक शेतातील बांध्यांचे पाळे फुटून धान पिकाचे नुकसान झाले. लहान-मोठ्या बोड्यांमध्ये पाणीसाठा वाढल्याने काही ठिकाणच्या बोड्या फुटल्या. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्याच्या दुडेपल्ली येथील शेतकरी काटा जोरना मट्टामी यांच्या शेतात मोठा तलाव आहे. तीन-चार दिवस झालेल्या दमदार पावसाने या तलावाची पाळ शुक्रवारी फुटली. त्यामुळे तलावाखालील शेतजमिनीतील धानपीक वाहून गेले. यामुळे २५ शेतकºयांचे नुकसान झाले. आता शेतात रेती जमा झाली आहे. सदर तलावात मट्टामी यांनी १० हजार रूपये किमतीचे ८ ते ९ किलो मत्स्य बीज टाकले होते. मात्र तलावाची पाळ फुटल्याने सर्व मत्स्य बीज वाहून गेले. मत्स्य पालन व्यवसायातून दरवर्षी मट्टामी यांना ३० ते ४० हजार रूपये उत्पन्न मिळत होते, अशी माहिती गावातील प्रतिष्ठीत नागरिक देजू पुंगाटी यांनी लोकमत प्रतिनिधींना सांगितले. तलाव फुटल्याने शेतकरी मट्टामी यांचे सर्वाधिक नुकसान झाले. प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त सर्वच २५ शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करणारदुडेपल्ली येथील बोळीची पाळ फुटून धान पिकाची नुकसान झाल्याबाबतची माहिती कोणत्याही शेतकऱ्यांनी स्वत: कार्यालयातून येऊन दिली नाही. संततधार पाऊस असल्यामुळे कुठेही जाता येत नाही. तालुक्यातील सर्व नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज बांधून सर्व तलाठी व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुडेपल्ली गावासह तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार, अशी माहिती तहसीलदार कैलास अंडील यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती