शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुलींकडून पित्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; भासू दिली नाही मुलाची उणीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 19:41 IST

Gadchiroli News देसाईगंज येथील गांधी वार्डात वास्तव्यास असणाऱ्या विठ्ठलराव  पेंदोर या ८६ वर्षीय वडीलाच्या निधानानंतर त्यांच्या मुलींनी अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन्ही मुली पुढे सरसावल्या.

गडचिरोलीः  मुलगा म्हणजे वंशाचा दिवा व मुलगी म्हणजे परक्याचे धन, या उक्तीप्रमाणे समाज आजही काहीअंशी वावरत आहे.परंतु या माणसीकतेला आणि परंपरेला छेद देत देसाईगंज येथील गांधी वार्डात वास्तव्यास असणाऱ्या विठ्ठलराव  पेंदोर या ८६ वर्षीय वडिलांच्या निधानानंतर त्यांच्या मुलींनी अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन्ही मुली पुढे सरसावल्या व मयताच्या  तिरडीस खांदा देत हातात आगीचा भांडा, सुप व खांद्यावर कुल्लाडी घेवून अंत्ययात्रेत समाविष्ट झाल्या.         देसाईगंज शहरातील गांधी वार्डात निवासी बंडू सिडाम व जगदिश कुळसंगे यांचे मयत विठ्ठलराव पेंदोर सासरे होत. ते मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील रेणकापुर भातुकली या खेडेगावातील रहिवाशी होते.परंतु नोकरीच्या निमित्ताने ते कुरखेडा येथे स्थायीक झाले. ते शिक्षक होते. या पेंदोर दांपत्यास दोन मुलीच आहेत.दोन्ही मुली शिक्षीका आहेत. त्यांचे पती देखील नोकरीला आहेत. पत्नीचे निधन गत पंधरा वर्षापुर्वीच झाले.त्यामुळे सेवानिवृत्त विठ्ठलराव जावई व मुलींकडेच राहू लागले. अशातच वार्धक्यामुळे त्यांचे निधन मुलींच्या घरीच झाले. जावई,नातवंडे व बराच मोठा आप्तपरीवार देसाईगंज येथे असल्याने त्यांच्या मुलींनी येथेच अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. दिनांक ९ फेब्रुवारी २०२२ रोजी मृत्यु झालेल्या पित्याच्या देहाला दुसऱ्या दिवशी वैनगंगा घाटावर त्यांच्या सुनंदा व उषा नामक मुलींनी मुखाग्नी दिला.

टॅग्स :Socialसामाजिक