शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

क्रेडिट कार्डधारकांना मिळणार सुविधांचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST

पीएम किसान योजनेमार्फत शेतकºयांना कर्ज पुरवठा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाकडून प्रशासन व बँकांना प्राप्त झाल्या आहेत. विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पीएम किसान लाभार्थ्यांनी किसान क्रेडीट कार्डमार्फत सुविधा द्याव्यात, यासाठी प्रशासनाच्या वतीने जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. क्रेडीट कार्डधारक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी सिंगला यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्ज पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेत समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील १ कोटी ६८ लाख किसान क्रेडीट कार्डधारक शेतकºयांना कर्ज सुविधेचा लाभ मिळणार आहे. किसान क्रेडीट कार्डवरून पात्रतेनुसार ३ लाखापर्यंतचे कर्ज (अर्थसहाय्य) त्यांना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत दिली.पीएम किसान योजनेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाकडून प्रशासन व बँकांना प्राप्त झाल्या आहेत. विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पीएम किसान लाभार्थ्यांनी किसान क्रेडीट कार्डमार्फत सुविधा द्याव्यात, यासाठी प्रशासनाच्या वतीने जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. क्रेडीट कार्डधारक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी सिंगला यांनी केले.जिल्ह्यात २३ फेब्रुवारी २०२० पर्यंत १५ दिवस तालुका व गावस्तरीय बैठकांमधून शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड घेण्याबाबत माहिती दिली जाणार आहे. किसान क्रेडीट कार्डमार्फत केल्या जाणाऱ्या कर्जवाटपात १ लाख ६० हजार रुपयापर्यंतच्या कर्जाला कोणत्याही प्रकारची हमी शेतकऱ्यांना सादर करावी लागणार नाही. १ लाख ६० हजार ते ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी प्रक्रिया खर्च, कागदपत्र खर्च, तपासणी सेवा शुल्क तसेच इतर आकार बँकांमार्फत माफ केले जाणार आहे. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना बँकांमार्फत किसान क्रेडीट कार्ड योजनेअंतर्गत पीक कर्ज उपलब्ध करून दिला जाणार आहे.एकाच पानाचा राहणार अर्जकिसान क्रेडीट कार्डधारक शेतकऱ्यांना विविध कर्ज मागणीसाठी सर्वंच बँकांकरिता एका पानाच्या अर्जाचा नमुना इंडियन बँक्स असोसिएशनमार्फत तयार करण्यात आला आहे. सदर अर्ज सर्व बँक शाखा तसेच सेवा सहकारी सोसायट्या व आदिवासी विविध कार्यकारी संस्थांकडे उपलब्ध करून देण्यात आला आहे. कर्ज मागणीच्या अर्जासोबत शेतकऱ्यांना कर्ज नसल्याबाबतचे घोषणापत्र, सातबारा व पीक पेऱ्याचा तपशील आदी दस्तावेज जोडावे लागणार आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या बँक शाखेत, सेवा सोसायटी कार्यालयात भेट द्यावी, असे जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक प्रमोद भोसले यांनी सांगितले.मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धनासाठी वाढीव कर्ज देणारज्या लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडीट कार्ड आहे, अशा शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसान मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन व्यवसायासाठी वाढीव कर्ज मर्यादा मंजूर करण्यात येणार आहे. किसान क्रेडीट कार्ड असूनही काही शेतकरी त्याचा वापर करीत नाही. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे किसान क्रेडीट कार्डचे खाते क्रियाशील केले जाणार आहे, अशी माहिती सदर बैठकीत अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी