शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

नेहरू शाळेत आकाशवाणी केंद्राची निर्मिती

By admin | Updated: February 24, 2016 01:23 IST

शहरातील आयएसओ मानांकित असलेल्या जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा रामनगरने आकाशवाणी केंद्राची निर्मिती केली ...

खासदारांच्या हस्ते उद्घाटन : विद्यार्थ्यांशी साधला संवाद; उपक्रमांचे केले कौतुकगडचिरोली : शहरातील आयएसओ मानांकित असलेल्या जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा रामनगरने आकाशवाणी केंद्राची निर्मिती केली असून या केंद्राचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत न. प. उपाध्यक्ष प्रा. रमेश चौधरी, शिक्षण सभापती विजय गोरडवार, केंद्रप्रमुख राधेश्याम भोयर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांच्या संकल्पनेतून या शाळेत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. आकाशवाणी केंद्र हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. खासदारांनी आकाशवाणी केंद्रावरून वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला. त्यानंतर डिजीटल वर्गास भेट देऊन कार्यप्रणाली जाणून घेतली. ज्ञानरचनावादाचे प्रात्यक्षिकही करून दाखविण्यात आले. यावेळी खा. अशोक नेते यांनी मानव विकास मिशनच्या माध्यमातून शाळेला शैक्षणिक तंत्रज्ञान व सामग्री खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले. इतर शाळांनी नेहरू शाळेच्या उपक्रमांपासून बोध घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांच्यासह शाळेतील शिक्षक महेंद्र शेडमाके, रवींद्र गंदेवार, राजेंद्र पेंदाम, ललीत म्हस्के, सुलभा देवांग, शर्मिला मने, रंजना शेडमाके, पुष्पलता बनकर, प्रियंका रायपुरे, सुनीता भुरसे, मंजूषा तुमराम आदी उपस्थित होते. शाळेतील नावीन्यपूर्ण उपक्रमाचे खासदार व न. प. पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. (नगर प्रतिनिधी)