शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
3
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
4
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
5
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
6
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
7
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
8
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
9
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
10
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
11
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
12
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
13
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
14
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
15
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
16
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
17
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
18
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
19
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!
20
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार

विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2016 01:21 IST

भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरसे यांच्या नेतृत्त्वात गडचिरोली येथील शिष्टमंडळाने केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांची ....

विविध समस्यांवर चर्चा : गडचिरोलीचे शिष्टमंडळ हंसराज अहिर यांना भेटलेगडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरसे यांच्या नेतृत्त्वात गडचिरोली येथील शिष्टमंडळाने केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. दरम्यान यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपाच्या शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरसे यांच्यासह बंडू झाडे, विजय सेडमाके, प्रदीप आवळे, एकनाथ निकुरे, गुरूदेव गव्हारे, लोढे, रवी भोयर, यशवंत झरकर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांसह विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा देण्यात यावा, गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यात याव्या, शेतकऱ्यांच्या शेतातील मालाचे जेवढे नुकसान होईल, त्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतातील रोवणी, नांगरणी व धान कापणी आदी सर्व कामे मनरेगामार्फत करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या. विदर्भावर प्रचंड अन्याय झाला आहे. विदर्भाच्या सर्वच क्षेत्रात प्रचंड अनुशेष वाढला आहे. विदर्भातील सिंचन, नोकरी, उद्योग आदी बाबींचा संयुक्त महाराष्ट्रात राहून विकास होऊ शकत नाही. त्यामुळे सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करून विदर्भातील लोकांना न्याय द्यावा, अशी मागणी ना. हंसराज अहिर यांच्याकडे करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्यांसंदर्भात आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार, असे आश्वासन केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी शिष्टमंडळाला दिले. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे आपण केंद्र सरकारचे लक्ष गांभीर्याने वेधणार, असेही ना. अहिर यावेळी म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)