शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा भ्याड हल्ला, नागपूरचे सुपुत्र आयपीएस आकाश राव गिरीपुंजे शहीद

By संजय तिपाले | Updated: June 9, 2025 14:13 IST

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सुरु होते अभियान : सुकमा जिल्ह्यात गस्त घालताना घडवला भूसुरुंग स्फोट

गडचिरोली  : छत्तीसगडमध्ये जवान व माओवाद्यांमध्ये चकमकीचे सत्र सुरु असतानाच ९ जून रोजी सकाळी ११ वाजता माओवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. या भ्याय हल्ल्यात महाराष्ट्रातील सुपुत्र व मूळचे नागपूरचे आयपीएस अधिकारी व छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्याच्या कोंटा विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आकाश राव गिरीपुंजे (४६) हे शहीद झाले. इतर काही अधिकारी व कर्मचारी जखमी आहेत.

माओवाद्यांचा सर्वोच्च नेता व मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा महासचिव नंबाला केशव राव उर्फ बसवा राजू याचा सुरक्षा जवानांनी २१ मे रोजी झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला होता. या चकमकीत एकूण २७ माओवादी ठार झाले होते. दरम्यान, बसवा राजूच्या स्मरणार्थ व सरकारच्या निषेधार्थ माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती उर्फ अभय याने १० जून रोजी बंदचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर सुकमा जिल्ह्यात ९ जून रोजी सकाळी माओवादविरोधी अभियान राबविण्यात येत होते. या मोहिमेत कोंटा विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आकाश राव गिरीपुंजे हे स्वत: जवानांसोबत पायदळ गस्तीसाठी रस्त्यावर उतरले होते. कोंटा-एर्राबोर मार्गावरील डोंड्रा गावाजवळ माओवाद्यांनी आधीच सापळा रचून ठेवलेला होता. रस्त्याच्या खोल भागात लपवलेला स्फोटक सापळा गस्ती दरम्यान अचानक उडवण्यात आला. स्फोट इतका जबरदस्त होता की, अतिरिक्त अधीक्षक गिरीपुंजे यांना वाचवण्याची संधीच मिळाली नाही. कोंटाचे ठाणेप्रमुख व आणखी काही जवान जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

मी पुढे चाललोय म्हणणारे गिरीपुंजे खरेच पुढे निघून गेलेअतिरिक्त पोलिस अधीक्षक आकाश राव गिरीपुंजे हे गस्तीवर असताना जवानांना चालण्यासाठी हिंमत देत. 'मी पुढे चाललोय तुम्ही मागे उभे राहून नका', असे सांगणारे गिरीपुंजे आज खरेच आम्हाला सोडून पुढे निघून गेले.... अशा भावना व्यक्त करत सोबतच्या जवानांचा कंठ दाटून आला. भरल्या डोळ्यांनी त्यांनी त्यांचा मृतदेह तेथून आणला, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

माओवाद्यांनी तंत्र बदलले का?सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आता नक्षलवादी स्फोटके २ फूट किंवा त्याहून अधिक खोल रस्त्याखाली लपवत आहेत. त्यामुळे डिटेक्टर उपकरणांनीही त्यांचा थांगपत्ता लागत नाही. माओवादविरोधी अभियानाआधी रोड ओपनिंग केली जाते, यात या स्फोटकांचा जवानांना अंदाज आला नाही.  यापूर्वी बिजापूरमध्येही अशाच पद्धतीने हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे माओवाद्यांनी तंत्र बदलले का, असा प्रश्न सुरक्षा यंत्रणांना पडला आहे.

अनेक धाडसी मोहिमांमध्ये होते अग्रस्थानीआकाश राव गिरीपुंजे हे महाराष्ट्रातील विदर्भाचे सुपुत्र होते. नागपूर जिल्ह्यातले मूळ रहिवासी असलेले गिरीपुंजे मोठ्या जिद्दीने आयपीएस झाले होते. त्यांनी छत्तीसगडमध्ये अनेक माओवादविरोधी मोहिमा ययशस्वीरीत्या पार पाडल्या होत्या. ते शिस्तप्रिय, मनमिळावू आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने पोलिस दल हळहळले आहे. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगडGadchiroliगडचिरोली