लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली येथील प्रेमीयुगुलाने गडचिरोली-मूल मार्गावरील वैनगंगा नदीपुलावरून शुक्रवारी सकाळी ९ वाजता उडी घेतली. ते दोघेही बेपत्ता आहेत.प्रतीक राजू गिरडकर (१८) रामनगर, गडचिरोली व कांचन अरविंद नागोसे (१७) वन विभाग कॉलनी गडचिरोली अशी नदीत उडी घेतलेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. प्रतीक व कांचन हे दोघेही एकमेकांवर प्रेम करीत होते. ही बाब कांचनच्या आईवडीलांना माहीत झाल्यानंतर कांचनचे तिच्या आईवडीलांसोबत शुक्रवारी रात्री भांडण झाले. त्यामुळे कांचन मानसिक तणावात येऊन पहाटे ४ वाजताच्या सुमारास घरून निघून गेली. प्रतीकच्या दुचाकीवर बसून दोघेही नदीपुलाकडे गेले. सकाळी ८ वाजताच्या सुमारास प्रतीकच्या आईने प्रतीकला फोन केला असता, अर्ध्या तासामध्ये आपण परत येत असल्याचे सांगितले. मात्र ९ वाजता प्रतीक व कांचनने वैनगंगा नदीपुलावरून पाण्यात उडी घेतली. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी दोघांनाही उडी घेतांना बघितले. याबाबतची माहिती गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली पोलीस स्टेशनला देण्यात आली. दोन्ही पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी बोटीने शोधकार्य सुरू केले. मात्र वृत्त लिहीपर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता.
गडचिरोलीत नदीपुलावरून उडी घेऊन युगुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 15:43 IST
Gadchiroli News suicide गडचिरोली येथील प्रेमीयुगुलाने गडचिरोली-मूल मार्गावरील वैनगंगा नदीपुलावरून शुक्रवारी सकाळी ९ वाजता उडी घेतली. ते दोघेही बेपत्ता आहेत.
गडचिरोलीत नदीपुलावरून उडी घेऊन युगुलाची आत्महत्या
ठळक मुद्दे वैनगंगा नदीवरील घटना