शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नागरिक पिताहेत आराेग्यास घातक बनावट दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 05:00 IST

जिल्ह्यात अधिकृतपणे दारू मिळत नसली तरी भंगाराच्या दुकानात किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या नगर परिषदांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांमध्ये दररोज दारूच्या बाटल्यांचा मोठा खच जमा झालेला असतो. त्यातील बाटल्यांच्या संख्येवरून जिल्ह्यात कोणता ब्रॅँड सर्वाधिक लोकप्रिय आहे, याचा सहज अंदाज येतो. कमी किमतीच्या व्हिस्की विक्रीचे प्रमाण जास्त आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या ती ३ दशकांपासून गडचिरोली जिल्ह्यात लागू असलेल्या दारू बंदीनंतरही जिल्ह्यात पिणारे आणि पाजणारे (पुरवठादार) लोकसंख्येनुसार वाढतच आहेत. चोरून-लपून पुरविल्या जात असलेल्या दारू मध्ये बनावट दारूचे प्रमाण बरेच वाढले आहे. हलक्या दारूत आणखी केमिकल्स मिसळून ते विविध विदेशी कंपन्यांचे लेबल लावलेल्या बाटल्यांमध्ये भरून त्याची विक्री केली जात असल्यामुळे ही दारू आरोग्यासाठी अपायकारक ठरत  आहे. जिल्ह्यात अधिकृतपणे दारू मिळत नसली तरी भंगाराच्या दुकानात किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या नगर परिषदांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांमध्ये दररोज दारूच्या बाटल्यांचा मोठा खच जमा झालेला असतो. त्यातील बाटल्यांच्या संख्येवरून जिल्ह्यात कोणता ब्रॅँड सर्वाधिक लोकप्रिय आहे, याचा सहज अंदाज येतो. कमी किमतीच्या व्हिस्की विक्रीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे छत्तीसगड, मध्यप्रदेशातील हलक्या दर्जाच्या दारूपासून तयार केलेल्या लोकप्रिय ब्रँडच्या बनावट दारूची विक्री सर्रासपणे केली जाते. ही बनावट दारू अधिक घातक ठरत असल्यामुळे त्याला आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ज्यांना या बनावट दारूची कल्पना आहे ते लोक आता अधिकचे पैसे देऊन बनावट दारू घेण्याऐवजी अधिकचे पेट्रोल खर्च करून लगतच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेत जाऊन आपला शौक पूर्ण करीत आहेत.

काय आहेत बनावट दारूचे परिणाम ?  - कमी खर्चात अधिक झिंग यावी, यासाठी अशुध्द दारूमध्ये अधिक रासायनिक पदार्थ मिसळून ते लाेकप्रिय ब्रॅन्डची दारू म्हणून विकली जाते. हे करताना बाटली  व्यवस्थित सील केल्याने त्यात बाहेरून दारू भरल्याचे ओळखू येत नाही. ही दारू घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी डाेकं दुखण्याचा त्रास हाेताे. वारंवार घेतल्याने लिव्हर खराब हाेते.

युवा पिढीत वाढले दारूचे आकर्षणजिल्ह्यातील युवा पिढीतही आता मोठ्या शहरातील युवा वर्गाप्रमाणे ‘सेलिब्रेशन’चे फॅड वाढले आहे. लहानपणापासून दारूबंदी पाहात असल्याने या युवा पिढीला सर्वाधिक आकर्षण त्याचेच आहे. त्यामुळे मित्राने दारूची पार्टी द्यावी, अशी त्यांची अपेक्षा असते. यातून अनेकांना दारूचे व्यसन जडून त्यांच्या जीवनाची दशा होत आहे. इतर वस्तूंप्रमाणे दारू सहज मिळणारी वस्तू असती तर युवा पिढीसह कोणालाच त्याचे आकर्षण वाटले नसते, अशी भावना एका सुशिक्षित युवकाने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

 

टॅग्स :liquor banदारूबंदी