शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: बेजबाबदारपणाचा कळस; गडचिरोलीत पीपीई किट फेकली रस्त्याच्या कडेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 17:54 IST

CoronaVirus News: कोरोनाचा धोका वाढला असताना प्रशासनाचा बेजबाबदारपणा

- नितेश पाटीलकुरुड (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढून मृत्यूही ओढवणे सुरू झाले असताना दुसरीकडे पीपीई किटची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता ती बेवारस अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून देण्याचा प्रकार 'लोकमत'च्या निदर्शनास आला. त्या बेजबाबदार व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आव्हान आता आरोग्य आणि पोलीस विभागापुढे निर्माण झाले आहे.

देसाईगंज ते आरमोरी या मुख्य मार्गावरील कोंढाळा गावापासून काही अंतरावर आरमोरीच्या दिशेने जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला ती पीपीई किट रविवारी (दि.13) दुपारी पडलेली होती. रस्त्याने जाणारे लोक त्याकडे पाहात होते पण कोणीच त्याबाबतची माहिती प्रशासनाला दिली नाही. सदर प्रतिनिधीने याबाबत प्रभारी तहसीलदार दीपक गुट्टे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी अतिशय शांतपणे उत्तर देत त्या किटची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतला सूचना दिली जाईल असे उत्तर दिले. 

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना कोरोनाच्या विषाणूंची बाधा होऊ नये म्हणून डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना ही पीपीई किट दिली जाते. त्यामुळे त्या पीपीई किटवर कोरोनाचे विषाणू असण्याची डाट शक्यता आहे. अशावेळी त्या किटची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावणे गरजेचे असताना ग्रामपंचायतीकडून (साध्या पद्धतीने) विल्हेवाट लावण्याची भाषा तहसीलदारसारख्या जबाबदार व्यक्तीने करणे आश्चर्यकारक आहे.गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयासह आरमोरी आणि देसाईगंज येथे असलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये अशा किटचा वापर केला जातो. त्यामुळे ही किट नेमकी कोणी फेकली त्याचाही शोध घेणे गरजेचे असताना देसाईगंज तालुका प्रशासन मात्र त्याबाबत फारसे उत्सुक नसल्याचे दिसून आले. जिल्ह्यात कोरोनाचा सामाजिक संसर्ग सुरू झाला असताना प्रशासन कोरोना रोखण्याबाबत खरंच गंभीर आहे का? असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या