शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: निवडणुकीला स्थगिती; पण आचारसंहितेचे सावट कायम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 18:10 IST

प्रशासन संभ्रमात; आयोगाकडे मागितले मार्गदर्शन 

गडचिरोली: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीला अखेर राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. पण नव्याने ही प्रक्रिया सुरू होईपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता उठवण्यासंदर्भात कोणतेही स्पष्ट निर्देश नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा संभ्रमात पडली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने आयोगाकडे मार्गदर्शन मागितले आहे.राज्यातील १९ जिल्ह्यांमधील १५७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या ३१ मार्च रोजी मतदान होणार होते. पण प्रचाराची रणधुमाळी, मतदान आणि मतमोजणीसाठी होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी सदर निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश दि.१७ ला निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हा प्रशासनाला दिला.निवडणुकीच्या नियोजित कार्यक्रमानुसार दि.१६ ही नामांकन दाखल करण्याची शेवटची मुदत होती.  तोपर्यंतची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पण नामांकनांची छाननी होऊन वैध-अवैध नामांकन ठरवणे, त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणे आणि प्रत्यक्ष मतदान व मतमोजणी हे महत्वाचे टप्पे बाकी आहेत.

पुन्हा नामांकन भरण्याची गरज नाहीकोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर ज्यावेळी निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू होईल त्यावेळी उमेदवारांना नव्याने नामांकन दाखल करण्याची गरज पडणार नाही, असे गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने होणार नसून ज्या टप्प्यावर प्रक्रिया थांबविली तेथून ती पुढे सुरू होणार आहे.

निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेला स्थगिती देताना आयोगाने आचारसंहिता उठवायची की ठेवायची, याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाही. निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र देऊन मार्गदर्शन मागविले आहे. अद्याप आयोगाकडून त्याबाबतचे मार्गदर्शन मिळालेले नाही.- दीपक सिंगला, जिल्हाधिकारी, गडचिरोली 

टॅग्स :Electionनिवडणूक