शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपत्ता व्यवसायावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 14:19 IST

शासनाने तेंदू व्यवसायाला परवानगी दिली असली तरी त्यासाठी अनेक नियम घालून दिले आहेत. त्या नियमांमुळे या व्यवसायासाठी लागणारे कुशल मजूर मिळणे कठीण होणार असल्यामुळे तेंदूपत्ता संकलन यावर्षी किती प्रमाणात होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे मजुरांची चणचण भेडसावणार प्रत्यक्षात पालन होणे कठीणचप्रशासनाचे कडक नियम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील महत्त्वाच्या व्यवसायांपैकी एक असलेल्या तेंदूपत्ता व्यवसायावर यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावाचे सावट पसरले आहे. शासनाने तेंदू व्यवसायाला परवानगी दिली असली तरी त्यासाठी अनेक नियम घालून दिले आहेत. त्या नियमांमुळे या व्यवसायासाठी लागणारे कुशल मजूर मिळणे कठीण होणार असल्यामुळे तेंदूपत्ता संकलन यावर्षी किती प्रमाणात होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरवर्षी उन्हाळ्यात तेंदूपत्ता तोडाई करण्याच्या कामात जिल्ह्यातील हजारो मजुरांसह लगतच्या चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील कुशल मजूर गडचिरोली जिल्ह्यात येत असतात. तेंदूपानांच्या पुडक्यांना वाळविल्यानंतर ते कट्ट्यात विशिष्ट पद्धतीने रचले जातात. या सर्व कामासाठी मजुरांचे कौशल्य पणाला लागते. परंतु यावर्षी बाहेरगावच्या मजुरांना या कामासाठी येण्यास परवानगीच नाही.कट्ट्यात पुडके भरताना किंवा इतर सर्व कामांसाठी विशिष्ट अंतर ठेवणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात कट्टा भरताना पाच ते सहा मजूर एकमेकांच्या लगत उभे राहत असतात. अशावेळी अंतराचा नियम पाळणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या व्यवसायातील गरजा लक्षात घेऊन शासनाने योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या व्यवसायासाठी इतर जिल्ह्यातून कुशल मजुरांना येण्याची परवानगी असावी. याशिवाय फळीवर शासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना देखरेखीसाठी ठेवल्यास हे काम चांगल्या पद्धतीने होऊ शकेल.- बंडोपंत मल्लेलवार, कंत्राटदार

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस