शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 12:32 IST

मूलचेरा येथील नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजय साबळे हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. गेल्या औरंगाबादवरून आले होते. पण क्वारंटाईन न होताच ते कार्यालयात रुजू झाले.

ठळक मुद्देक्वारंटाईन न होताच कामावर रुजूसंपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू 

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मूलचेरा येथील नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजय साबळे हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. गेल्या औरंगाबादवरून आले होते. पण क्वारंटाईन न होताच ते कार्यालयात रुजू झाले. यादरम्यान अनेक लोकांशी त्यांचा संपर्क आला. कार्यालयीन बैठकांनाही ते हजर होते. त्यामुळे अनेक लोकांशी त्यांचा संपर्क आला असून त्या लोकांचा शोध घेणे सुरू केले आहे.मुलचेराचे तहसीलदार, प्रभारी पोलीस अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह 19 जणांची यादी आरोग्य विभागाने तयार केली आहे. आज अधिकारी वगार्ची रॅपिड टेस्ट घेण्यात येणार आहे. त्यांना गृह विलगीकरण ठेवणार असल्याची माहिती आहे.उर्वरित कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.मुख्याधिकारी साबळे हे 23 जूनला औरंगाबादवरून मुलचेरा येथे आले. येथे आल्यानंतर त्यांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक होते. मात्र कार्यालयीन जबाबदाऱ्यांमुळे त्याकडे दुर्लक्ष झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याची कल्पना असून आपण योग्य ती खबरदारी घेऊनच लोकांच्या संपर्कात आल्याचे साबळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. येथील विलगीकरण कक्षाच्या झोनल ऑफीसरची जबाबदारीसुद्धा तहसीलदारांनी साबळे यांच्याकडे सोपवलेली आहे. साबळे हे मुलचेरा येथे आल्याबरोबर नगरपंचायतीच्या स्थायी समितीची सभा घेतली ज्यात नगराध्यक्षांसह पाच सभापती उपस्थित होते. यासोबतच जमीनवादाची सुनावणी मुख्याधिकारी यांनी घेतली. तिथेसुद्धा त्यांचा अनेकांसोबत संबध आल्याची चर्चा आहे. त्यांच्या संपकार्मुळे मुलचेरा, विवेकानंदपूर गावात भीतीचे वातावरण पसरले असून ही दोन्ही गावे कन्टेन्टमेंट झोन म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस