शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

१२ ला गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 05:00 IST

राज्यपाल कोश्यारी हे सोमवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी गडचिरोलीत पोहोचतील. दि.१२ ला सकाळी एमआयडीसी परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्यावतीने आयोजित गुजरातपर्यंतच्या सायकल रॅलीचा राज्यपालांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला जाणार आहे.  त्याचदिवशी सकाळी गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचा नववा दीक्षांत समारंभ येत्या १२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्ष चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.राज्यपाल कोश्यारी हे सोमवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी गडचिरोलीत पोहोचतील. दि.१२ ला सकाळी एमआयडीसी परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्यावतीने आयोजित गुजरातपर्यंतच्या सायकल रॅलीचा राज्यपालांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला जाणार आहे.  त्याचदिवशी सकाळी गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.पालकमंत्री शिंदे दि.११ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते दि.१२ रोजी सकाळी सीआरपीएफच्या कार्यक्रमाला राज्यपालांसोबत उपस्थित राहणार आहेत. तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभालाही उपस्थित राहणार आहेत.  दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ऑक्सिजन एल.एम.ओ. प्लान्ट आणि पी.एस.ए.प्लान्टच्या उद्घाटन सोहळ्यास तसेच रुग्णवाहिका वाटप कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पालकमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ४ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चव्हाण हे १२ रोजी सकाळी गडचिरोली येथे  गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर दुपारी एकात्मिक आदिवासी  विकास  प्रकल्प, गडचिरोलीमधील अधिकाऱ्यांसोबत  बैठक  घेणार  आहेत.

गडचिरोली भेटीदरम्यान दि.११ ला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी चातगाव येथील ‘सर्च’ संस्थेच्या शोधग्रामला सदिच्छा भेट देणार आहेत. आदिवासी व ग्रामीण जनतेची आरोग्य सेवा, संशोधन तसेच दारू-तंबाखू मुक्तीसाठी केल्या जाणाऱ्या कार्याची माहिती जाणून घेतील तसेच डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांची भेट घेऊन त्यांच्या उपक्रमांची माहिती घेतील. त्यासाठी शोधग्राममध्ये राज्यपालांच्या स्वागताची तयारी सुरू आहे.

 

टॅग्स :universityविद्यापीठbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी