शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्याची अखेर उचलबांगडी ! माधुरी किलनाके नव्या 'सीएस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 14:31 IST

Gadchiroli : 'लोकमत'चा दणका अनिल रुडेंकडील पदभार काढला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गैरव्यवहाराचे आरोप, वादग्रस्त कारकीर्दीमुळे चर्चेत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रुडे यांच्याकडील जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा अतिरिक्त पदभार अखेर १६ ऑगस्टला काढून घेतला. जिल्हा शल्यचिकित्सकपदी याच रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी (वर्ग १) डॉ. माधुरी किलनाके यांच्या नियुक्तीचे आदेश उपसंचालक (आरोग्य सेवा) डॉ. कांचन वानेरे यांनी काढले. 'लोकमत'ने याबाबत वृत्त प्रकाशित करून आरोग्य विभागातील नियुक्त्यांमधील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आणला होता.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांनी सेवानिवृत्तीच्या मुदतवाढीसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) नागपूर येथे दाद मागितली होती. मात्र, २९ जुलै २०२४ रोजी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे जागा रिक्त झाली होती. डॉ. माधुरी किलनाके या वर्ग १ अधिकारी असतानाही त्यांना डावलून वर्षभरापूर्वीच निवृत्त झालेले व विशेष बाब म्हणून पुन्हा सेवेत आलेले रुग्णालय प्रशिक्षण केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रुडे यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. विशेष म्हणजे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, सर्जन व इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत मर्जीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन डॉ. रुडे हे लगबगीने जिल्हा शल्यचिकित्सक पदाच्या खुर्चीत बसले होते. डॉ. रुडेंविरुद्ध उपसंचालकांकडे तक्रारी होत्या. तसेच गोंदियातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फतही त्यांची चौकशी सुरू आहे.

'लोकमत'ने १४ ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करून याकडे लक्ष वेधले होते. यानंतर आरोग्य विभागाने १६ ऑगस्ट रोजी डॉ. माधुरी किलनाके यांची विनंतीनुसार गडचिरोलीच्या जिल्हा शल्यचिकित्सकपदी नियुक्ती केली.

रुडे हटाव... काँग्रेसचे आंदोलन जाहिर निषेध !दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अॅड. कविता मोहरकर यांनी शहरातील इंदिरा गांधी चौकात डॉ. अनिल रुडे हटाव.... जिल्हा रुग्णालय बचाव.. अशी घोषणाबाजी करून निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकारी संजय देने यांना निवेदन दिले. हे आंदोलन झाल्यानंतर तासाभरातच डॉ. रुडे यांना हटविल्याचे आदेश धडकले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली