अपर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : पीसीपीएनडीटी विभागामार्फत कार्यशाळागडचिरोली : जिल्ह्यात मुली व स्त्रियांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. या मागील कारणीभूत घटकांचा शोध घेऊन गर्भलिंग चाचणीवर नियंत्रण ठेवा जेणेकरून स्त्री व पुरूषांचे प्रमाण समान राहील, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्या मार्गदर्शनाखाली पीसीपीएनडीटी विभागामार्फत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने, पीसीपीएनडीटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. के. शेंद्रे यांच्यासह जिल्ह्याच्या सर्व तालुक्याचे सर्व तहसीलदार, वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते. सामाजिक घटक जागृत होऊन समाजात स्त्री वास्तव्याचा परिचय देण्याच्या मूळ संकल्पनेतून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही संकल्पना रूजविण्यात आली. तसेच प्रसवपूर्व निदान तंत्र कायदा २००३ ची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे, असे समूपदेशक माधुरी आटमांडे यांनी सांगितले. डॉ. ए. के. शेंद्रे यांनी, जनुकीय प्रयोगशाळा, समूपदेशन केंद्र, वंधत्व निवारण केंद्र, गरोदर मातेचे प्रतिज्ञापत्र, कोर्टात दाखल तक्रार, पंचनामा, याबाबत माहिती दिली. याप्रसंगी डॉ. कुंभारे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्र, गर्भपात केंद्र, सोनोग्राफी मशीन नुतनीकरण, आॅनलाईन एफ फार्म तसेच संमतीपत्र याबाबत सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी डॉ. किलनाके, वामन खंडाईत, प्रभाकर कोटरंगे उपस्थित होते. गरोदर मातांना मानसिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रश्न करावे, असे मार्गदर्शनातून सांगण्यात आले.संचालन डॉ. ए. एस. कुंभारे यांनी केले तर आभार डॉ. मसराम यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)
गर्भलिंगनिदान चाचणीवर नियंत्रण ठेवा
By admin | Updated: April 23, 2016 01:15 IST