शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
3
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
4
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
5
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
6
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
7
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
8
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
9
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
10
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
11
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
12
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
13
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
14
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
15
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
16
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
17
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
18
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
19
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
20
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:50 IST

समान काम, समान वेतन धोरणाचा अवलंब करण्यात यावा, एनआरएचएममधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात असलेल्या रिक्त जागांवर कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे, यासह विविध मागण्यांकरिता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ ....

ठळक मुद्देशासनाच्या धोरणाविरोधात एल्गार : एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : समान काम, समान वेतन धोरणाचा अवलंब करण्यात यावा, एनआरएचएममधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात असलेल्या रिक्त जागांवर कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे, यासह विविध मागण्यांकरिता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. २१ एप्रिल रोजी शनिवारला जिल्हा परिषद समोर एनआरएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. निदर्शनातून शासनाच्या धोरणाविरोधात शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात जवळपास ८५० कंत्राटी अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यीका, स्टाफ नर्स, लेखापाल, कार्यक्रम व्यवस्थापक आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात २००७ पासून हे ८५० कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. मात्र दहा वर्ष उलटूनही या कर्मचाऱ्यांना कामानुसार वेतन देण्यात आले नाही. तसेच त्यांना सेवेत कायम करण्यात आले नाही. संघटनेच्या वतीने सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. मात्र याची दखल शासनाने घेतली नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचारी आता शासनाच्या विरोधात एकवटले आहेत. ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तालुकास्तरावरही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. मात्र शासनाने निर्णय घेतला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शनिवारी गडचिरोलीच्या जि.प. समोर शासनाच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी डॉ. अनुपम महेशगौरी, डॉ. नंदू मेश्राम, रवीकिरण भडांगे, किरण रघुवंशी, रचना फुलझेले, संगीता महालदार, शरद गिरीपुंजे, मोहिता गोरेकर हजर होते.आरोग्यसेवा प्रभावितएनआरएचएमच अंतर्गत कार्यरत ८५० कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व जिल्हा रूग्णालयातील आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. नियमित कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने सदर आंदोलन काळात रूग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे.