शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

कोरोनाच्या दहशतीतही वीज कर्मचाऱ्यांची अविरत सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:01 IST

मानवी साखळी तोडून कोरोनाचा प्रसार थांबविण्यास केंद्र शासनाने २४ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत बहुतांश जनता घरीच बसून आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली असल्याने दहशत निर्माण झाली आहे. अशा दहशतीच्या कालावधीतही वीज कर्मचारी स्वत:ला वाहून घेत आहेत.

ठळक मुद्देकौतुकास्पद कार्य : कारोनाविरूद्धच्या लढाईत देत आहेत २४ तास सहभाग

अतुल बुराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : मानवी साखळी तोडून कोरोनाचा प्रसार थांबविण्यास केंद्र शासनाने २४ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत बहुतांश जनता घरीच बसून आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली असल्याने दहशत निर्माण झाली आहे. अशा दहशतीच्या कालावधीतही वीज कर्मचारी स्वत:ला वाहून घेत आहेत. त्यामुळेच घरातील सर्व वीज उपकरणे व्यवस्थित सुरू आहेत. परिणामी लॉकडाऊनच्या कालावधीत स्वत:ला बंदिस्त करून घेणे नागरिकांना शक्य झाले आहे. कोरोनाविरोधातच्या लढाईत वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांचेही महत्त्वाचे कार्य आहे, हे विसरून चालणार नाही.क्षणभरही वीज पुरवठा खंडीत झाल्यास ग्राहकांचा जीव कासावीस होते आणि थोडावेळ वीज आली नाही तर मनाचा संयम सुटतो. यावरून जीवनात वीज किती महत्त्वाची आहे हे लक्षात येते. लॉकडाऊनच्या कालावधीत ज्या अत्यावश्यक सेवांची यादी केंद्र शासनाने जाहीर केली आहे. त्यामध्ये वीज विभागाचाही समावेश आहे. ऊन, थंडी, वादळवारा, पाऊस अशा नैसर्गिक आपत्तींची तमा न बाळगता वीज पुरवठा सुरळीत राहिल्यास यासाठी वीज कर्मचारी अविरत काम करत राहतात.कोरोनाविरोधात लढणाºया प्रशासकीय यंत्रणांमध्ये आरोग्य विभाग व पोलिसांचे स्थान अग्रस्थानी आहे. मात्र वीज कर्मचाºयाच्याही कामाला दुर्लक्षित करून चालणार नाही. अंधारातही वीज दुरूस्तीचे काम करून सर्वांना प्रकाश देण्याचा प्रयत्न वीज कर्मचारी करत आहे. त्याच्याही कामाचे कौतुक होणे गरजेचे आहे. जेणे करून त्यालाही उत्साहाने काम करण्याची प्रेरणा मिळेल.देसाईगंज तालुक्यात घरगुती व वाणिज्य असे एकूण १६ हजार ग्राहक आहेत. त्यातील ८ हजार ७०० ग्राहक ग्रामीण भागातील आहेत. देसाईगंज आणि शंकरपूर येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रातून विसोरा, एकलपूर, शंकरपूर, कसारीसह एकूण १७ ग्रामपंचायतींना वीज पुरवठा होते. तालुक्यातील सर्वच कर्मचारी व अधिकारी खांद्याला खांदा लावून काम करीत असल्याने लॉकडाऊनच्या कालावधीतही नियमित वीज पुरवठा सुरू आहे.जिल्हाभरात दोन लाख ग्राहकांना सेवागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात एकूण २ लाख १२ हजार ७५४ वीज ग्राहक आहेत. यामध्ये १ लाख ९९ हजार ६३२ घरगुती ग्राहक, ८ हजार ९१६ वाणिज्य, १ हजार ४४८ औद्योगिक, २ हजार ३९४ सार्वजनिक, ३१२ सार्वजनिक पाणी पुरवठा योजना व ५२ उच्चदाब ग्राहक आहेत. यातील वाणिज्य व औद्योगिक ग्राहक वगळले तर घरगुती व सार्वजनिक ग्राहकांना वीज सेवा सुरू आहे. यासाठी एकूण ५७१ वीज कर्मचारी स्वत:ला वाहून घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या