शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवरगावातील वादावर 'संविधाना'चा तोडगा; चौकाला संविधान नाव देण्याचा निर्णय, ५६ कुटुंबे परतणार स्वगावी

By संजय तिपाले | Updated: December 23, 2023 18:47 IST

चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथे महापुरुषांच्या नावाच्या फलकावरुन वर्षभरापासून वाद आहे.

गडचिरोली: महापुरुषांच्या नावाचा फलक लावण्यावरुन दोन गटात वाद झाल्यानंतर ५६ दलित कुटुंबांनी बिऱ्हाड बैलगाडीत टाकून गाव सोडल्याची धक्कादायक घटना चामोर्शी तालुक्यातील नवरगावात घडली होती. या कुटुंबांनी आंदोलन करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला होता. मात्र, तोडगा निघू शकला नव्हता. अखेर २३ डिसेंबर रोजी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या दालनात झालेल्या बैठकीत दोन्ही गटाच्या लोकांना समोरासमोर बसवून समेट घडवून आणण्यात यश आले. या चौकाला संविधान नाव देण्याचा निर्णय झाला.

चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथे महापुरुषांच्या नावाच्या फलकावरुन वर्षभरापासून वाद आहे. हा वाद न्यायालयापर्यंत गेलेला आहे. ग्रामसभेने अधिकाराचा वापर करुन अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान २१ डिसेंबरला पोलिस बंदोबस्तात फलक हटविला. त्यानंतर दलित समाजाच्या ५६ कुटुंबातील सव्वादोनशे सदस्यांनी तीव्र रोष व्यक्त करत लहान मुले, धान्य, कपडे घेऊन बैलगाड्यांतून गाव सोडले.  शिवणी गावालगतच नदीकिनारी या सर्वांनी अंधारात थंडीत कुडकुडत रात्र काढली.  २२ डिसेंबरला घोषणा देत हे सर्व जण शहरात पोहोचले. इंदिरा गांधी चौकात निषेध सभा घेतल्यानंतर बैलगाड्यांसह मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडविले.

तोडगा न निघाल्याने या कुटुंबांनी नवेगाव बुध्द विहारात मुक्काम केला. २३ डिसेंबरला सरपंच खुशाल कुकडे यांच्यासह गाव सोडलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या शिष्टमंडळाला पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पुढाकार घेत समोरासमोर आणले. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा उपस्थित होते. दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून घेतल्यावर सामोपचाराची भूमिका घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा व पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले. त्यानंतर संविधान नावावर एकमत झाले व सामंजस्याने वादावर पडदा पडला. त्यामुळे तणाव निवळला आहे.

पोलिस बंदोबस्तात गावी सोडणारनवरगाव येथील वाद मिटविण्यासाठी झालेल्या बैठकीत संविधान या नावावर दोन्ही बाजूंनी एकमत झाले.  नामफलक उभारताना कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यास सांगितले आहे. या गावाला वादाची पार्श्वभूमी नाही. त्यामुळे यापुढेही एकोपा कायम ठेवावा, असे आवाहन केले आहे. गाव सोडलेल्या ५६ कुटुंबाना पोलिस बंदोबस्तात पुन्हा स्वगावी पोहोचविले जाणार आहे. दोन्ही बाजूंनी समजदारीची भूमिका घेतली गेली त्यामुळे नवरगाव येथील वाद सामोपचाराने मिटला आहे. कुठल्याही परिस्थितीत शांतता व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घ्यावी. - संजय मीणा, जिल्हाधिकारी 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली