शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

सहा पं.स.मध्ये सभापतींची निवड अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 06:00 IST

चामोर्शी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे भाऊराव डोर्लीकर तर उसभापती म्हणून वंदना गौरकर यांची निवड झाली. सभापती पदासाठी भाजपकडून भाऊराव डोर्लीकर तर काँग्रेसतर्फे धर्मशीला सहारे, उपसभापती पदासाठी भाजपकडून वंदना गौरकर व रासपचे माधव परसरोडे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. डोर्लीकर यांना १३ तर सहारे यांना ५ मते मिळाली. तसेच गौरकर यांना १३ तर परसोडे यांना ५ मते मिळाली.

ठळक मुद्देसर्वाधिक सहा जागी भाजपचे वर्चस्व : काँग्रेसला चार सभापतिपद, आविसं व ग्रामसभेला प्रत्येकी एका जागी यश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापतींची निवडणूक मंगळवार दि.३१ रोजी पार पडली. यात ६ जागी सभापती-उपसभापतींची निवड अविरोध झाली तर काही ठिकाणी सदस्यांच्या मतांची उलथापालथ झाल्याने बहुमत असतानाही दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराची वर्णी लागली. सर्वाधिक ६ सभापतीपद भाजपने पटकावले. त्यात गडचिरोली विधानसभा मतदार संघातील तीनही सभापतीपद भाजपकडे आले. यासाठी आ.डॉ.देवराव होळी यांनी विशेष पुढाकार घेतला. यासोबतच काँग्रेसच्या वाट्याला ४ तर आविसं आणि ग्रामसभेच्या वाट्याला प्रत्येकी एक सभापतीपद आले.गडचिरोलीत भाजपचे वर्चस्वगडचिरोली : अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव गडचिरोली पंचायत समितीवर भाजपने वर्चस्व स्थापित केले. सभापतीपदी मारोती ईचोडकर यांची निवड झाली तर उपसभापतीपदी विलास दशमुखे यांनी आपली जागा कायम ठेवली. सभापतीपदासाठी ईचोडकर यांना ५ तर तर काँग्रेसप्रणित अपक्ष उमेदवार सुषमा मेश्राम यांना ४ मते मिळाली. उपसभापतीपदासाठी दशमुखे यांना ६ तर काँग्रेसच्या जान्हवी भोयर यांना ३ मते मिळाली. पंचायत समिती सभागृहात झालेल्या या निवडणूक प्रक्रियेत पिठासीन अधिकारी म्हणून गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी कामकाज पाहिले.चामोर्शीत भाजपचे वर्चस्वचामोर्शी : चामोर्शी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे भाऊराव डोर्लीकर तर उसभापती म्हणून वंदना गौरकर यांची निवड झाली. सभापती पदासाठी भाजपकडून भाऊराव डोर्लीकर तर काँग्रेसतर्फे धर्मशीला सहारे, उपसभापती पदासाठी भाजपकडून वंदना गौरकर व रासपचे माधव परसरोडे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. डोर्लीकर यांना १३ तर सहारे यांना ५ मते मिळाली. तसेच गौरकर यांना १३ तर परसोडे यांना ५ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार संजय गंगथडे, अमोल गव्हारे, विस्तार अधिकारी नितीन पेंदोर यांनी काम पाहिले. निवडणुकीनंतर जल्लोष साजरा केला. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, दिलीप चलाख, रवींद्र ओल्लालवार, स्वप्नील वरघंटे, प्रकाश गेडाम, जयराम चलाख, मनमोहन बंडावार, बंडू चिळंगे, विकास मैत्र, सुरेश शहा, साईनाथ बुरांडे, माधवी पेशेट्टीवार, नरेश अलसावार, मधुकर भांडेकर, विनोद गौरकर, प्रशांत एगलोपवार, रिंकू पालारपवार, राजू चुधरी हजर होते.धानोºयात अविरोध निवडधानोरा : धानोरा पंचायत समितीत भाजपचे पाच तर काँग्रेसचे तीन सदस्य आहेत. विद्यमान उपसभापती अनुसया पोरेटी यांची सभापती म्हणून निवड झाली तर उपसभापतीपदी विलास गावडे यांची वर्णी लागली. दोघांचीही अविरोध निवड झाली. पिठासीन अधिकारी म्हणून धानोराचे तहसीलदार के. वाय. कुनारपवार, सहायक संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार, नायब तहसीलदार दीपक भैसारे यांनी काम पाहिले. निवडणुकीनंतर जल्लोष करण्यात आला. भाजप तालुकाध्यक्ष शशिकांत साळवे, साईनाथ साळवे, अजमन राऊत, अनंत साळवे, महादेव गणोरकर, विजय कुमरे, ताराबाई कोटांगले, विनोद निंबोरकर, नामदेव कुमरे, कविता मंटकवार, मेनाबाई कोवाची, सारंग साळवे हजर होते.आरमोरीत भाजपसह काँग्रेस बंडखोराची बाजीआरमोरी : आरमोरी पंचायत समितीत काँग्रेस व सेना आघाडीला स्पष्ट बहुमत असतानाही सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या दोन सदस्यांनी भाजपच्या बाजुने मतदान केल्याने सभापतीपदी भाजच्या निता गुरूनाथ ढोरे तर उपसभापती म्हणून काँग्रेसचे बंडखोर सदस्य विनोद बावणकर यांची निवड झाली आहे. आरमोरी पंचायत समितीत काँग्रेसचे चार, भाजपचे तीन, शिवसेनेचा एक असे संख्याबळ आहे. काँग्रेस सेना आघाडीकडून सभापती पदासाठी किरण बंडू मस्के तर उपसभापती पदासाठी सेनेचे यशवंत सुरपाम यांनी नामनिर्देशनपत्र भरले. भाजपकडून सभापती पदासाठी निता गुरूनाथ ढोरे तर उपसभापती पदासाठी काँग्रेसचे बंडखोर सदस्य विनोद बावणकर यांनी नामनिर्देशन भरले. आरमोरी पं.स.चे सभापती पद नामप्र महिला प्रवर्गासाठी राखीव होते. निता ढोरे यांना पाच, मस्के यांना तीन मते मिळाली. उपसभापती पदाचे उमेदवार सुरपाम यांना तीन तर बावणकर यांना पाच मते मिळाली. काँग्रेसचे दोन सदस्य गळाला लावून भाजपचे प्रथमच आपला झेंडा आरमोरी पं.स.वर रोवला. निवडणूक आटोपल्यानंतर सभागृहाबाहेर काँग्रेसचे पं.स. सदस्य व कार्यकर्त्यांनी बंडखोर सदस्यांविरोधात आपला रोष व्यक्त केला. निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींनी सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार कल्याणकुमार दहाट यांनी काम पाहिले.देसाईगंजात भाजपचे अविरोध वर्चस्वदेसाईगंज : देसाईगंज पंचायत समितीच्या सभापतीपदी रेवता अलोणे तर उपसभापतीपदी शेवंता अवसरे यांची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे, देसाईगंज पंचायत समितीत संपूर्ण सहा सदस्य भाजपचे आहेत. निवडणुकीनंतर जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, नगराध्यक्ष शालू दंडवते, न.प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, राजू जेठानी, नगरसेवक नरेश विठ्ठलानी, योगेश नाकतोडे, सुनील पारधी, अशोक नंदेश्वर, अर्चना ढोरे हजर होते. पिठासीन अधिकारी म्हणून डी. टी. सोनवाने यांनी काम पाहिले.कुरखेडात काँग्रेसचा बोलबालाकुरखेडा : कुरखेडा पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या सुनंदा हलामी, तर उपसभापतीपदी काँग्रेस समर्थित अपक्ष सदस्य श्रीराम दुग्गा यांची निवड करण्यात आली. या पंचायत समितीत १० पैकी ७ सदस्य काँग्रेसचे आहेत. स्पष्ट बहुमत असतानाही पक्षांतर्गत एकमत न झाल्याने सभापती पदासाठी काँग्रेसकडून सुनंदा हलामी व संध्या नैताम यांनी नामांकन दाखल केले. तर उपसभापतीपदासाठी विद्यमान उपसभापती मनोज दुनेदार व श्रीराम दुग्गा यांनी नामांकन दाखल केले. त्यामुळे पक्षात उभी फुट पडून तीन सदस्य संख्या असलेल्या भाजपच्या भूमिकेला महत्त्व आले. भाजपच्या दोन सदस्यांनी हलामी व दुग्गा यांच्या बाजुने मतदान केल्याने पाच विरूध्द चार अशा फरकाने ते निवडून आले. सुनंदा हलामी व श्रीराम दुग्गा यांच्या बाजुने काँग्रेसचे शारदा पोरेटी, भाजपचे बौध्दकुमार लोणारे व कविता गुरनुले यांनी मतदान केले. संध्या नैताम व मनोज दुनेदार यांच्या बाजुने काँग्रेसच्या माधुरी मडावी व भाजपच्या वर्षा कोकोडे यांनी मतदान केले. सभागृहात १० पैकी ९ सदस्य उपस्थित होते. मावळते सभापती गिरीधर तितराम हे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार माळी यांनी कामगिरी बजावली. निवडणुकीनंतर आतिषबाजी करण्यात आली. तसेच गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जि.प. सदस्य प्रल्हाद कराडे, माजी पं.स. सभापती परसराम टिकले, किशोर तलमले, माजी जि.प. सदस्य नंदू नरोटे, नगरसेविका आशा तुलावी, सरपंच टेकनशहा सयाम, उपसरपंच दामोधर वट्टी हजर होते.कोरचीत काँग्रेस-शिवसेनेची अविरोध जोडीकोरची : कोरची पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. सभापतीपदी काँग्रेसचे सदस्य श्रावण मातलाम तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या सुशीला जमकातन यांची निवड झाली. कोरची पंचायत समितीत एकूण चार सदस्य आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे दोन, शिवसेना व भाजपाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. निवडणुकीनंतर जल्लोष करण्यात आला. यावेळी शामलाल मडावी, मनोज अग्रवाल, हकीमुद्दीन शेख, सदरूद्दीन भामानी, रामकृष्ण मडावी, कचरीबाई काटेंगे, हर्षलता भैसारे, प्रमिला काटेंगे, कांताराम जमकातन, वसंत भक्ता, विठ्ठल शेंडे आदी हजर होते.मुलचेरात काँग्रेस-राष्टÑवादीचे वर्चस्वमुलचेरा : मुलचेरा पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या सुवर्णा चंद्रशेखर येमुलवार यांची तर उपसभापतीपदी राष्टÑवादी काँग्रेसच्या प्रगती मनोज बंडावार यांची निवड करण्यात आली. या पं.स.मध्ये भाजप, काँग्रेस व राकाँचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत. उपसभापतीपदासाठी भाजपच्या सरीता रवींद्र तोरे व राष्ट्रवादीच्या प्रगती मनोज बंडावार यांनी नामनिर्देशनपत्र सादर केले. प्रगती बंडावार यांना ४ तर सरीता तोरे यांना २ मते मिळाली. पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार भाऊसाहेब हाटकर यांनी काम पाहिले. सचिव म्हणून संवर्ग विकास अधिकारी युवराज लाकडे यांनी जबाबदारी सांभाळली.अहेरीत आविसंची बिनविरोध बाजीअहेरी : अहेरी पंचायत समितीचे सभापती म्हणून भास्कर तलांडे तर उपसभापती म्हणून गीता चालुरकर यांची बिनविरोध निवड झाली. हे दोन्ही उमेदवार आदिवासी विद्यार्थी संघाचे सदस्य आहेत. विजयानंतर जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी जि.प. सदय अजय नैताम, सुरेखा अलाम, राकेश तलांडे, पं.स. सदस्य शीतल दुर्गे, शारदा कोरेत, योगेश्वरी मोहुर्ले, छाया पोरतेट, अशोक येलमुले, उमेश मोहुर्ले, नरेश मडावी, दिवाकर आलाम, श्रीनिवास मडावी, गुलाबराव सोयाम, संपत सिडाम, दिलीप गंजीवार, संजय पोरतेट आदी हजर होते.भामरागडात बिनविरोध निवडभामरागड : भामरागड पंचायत समितीत ग्रामसभेचे तीन व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य आहे. सभापतीपदी गोईबाई कोडापे तर उपसभापती म्हणून सुखराम मडावी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.एटापल्लीत भाजपने मारली बाजीएटापल्ली : एटापल्ली पंचायत समितीत सभापतीपदी भाजपचे शालिकराम गेडाम व उपसभापतीपदी भाजपचेच जनार्धन नल्लावार हे निवडून आले. एटापल्लीत काँग्रेस एक, राकाँ तीन, भाजप एक, आविसं दोन, अपक्ष एक असे संख्याबळ आहे. राकाँचे सर्वाधिक तीन सदस्य असतानाही राकाँला सत्तेबाहेर राहावे लागले. सभापती पद अनुसूचित जमातीकरिता राखीव होते. सभापती पदासाठी काँग्रेसचे शालिकराम गेडाम, राकाँच्या बेबी लेकामी, बबिता मडावी, निर्मला गावंडे या तिघांनीही अर्ज केले. यापैकी बबिता मडावी व निर्मला गावडे यांचे अर्ज रद्द झाले. बेबी लेकामी यांनीही माघार घेतली. त्यामुळे शालिकराम गेडाम अविरोध विजय झाले. उपसभापती पदासाठी जनार्धन नल्लावार, राकाँच्या निर्मला गावडे व बबिता मडावी यांनी अर्ज केले होते. या दोघांनीही माघार घेतल्याने नल्लावार यांची अविरोध निवड झाली. पिठासीन अधिकारी म्हणून चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी यू. एम. तोडसाम, प्रभारी तहसीलदार डी. बी. सोरते, संवर्ग विकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी कामकाज पाहिले.सिरोंचात भाजपचे मोडम सभापती अविरोधसिरोंचा : सिरोंचा पंचायत समितीत भाजपचे सत्यम मोडम यांची सभापतीपदी तर उपसभापती म्हणून रिकुला कृष्णमूर्ती यांची अविरोध निवड झाली. विजयानंतर जल्लोष साजरा करण्यात आला.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीElectionनिवडणूक