शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

माझ्याविरूद्ध विरोधकांचे षड्यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:06 IST

चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडबोरी येथील गोंडवाना महासंमेलनात माना समाजाला आरक्षण मिळू देणार नाही, असे कपोलकल्पित विधान आपल्या तोंडी टाकण्याचा प्रयत्न हे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उभे केलेले विरोधकांचे षडयंत्र आहे. मी माना किंवा धनगर समाजाचा नेहमीच सन्मान करतो. असे असताना धादांत खोटे वृत्त पसरविणाऱ्यांवर आपण कायदेशिर कारवाई करणार, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देअशोक नेते : माना समाजाबद्दलचे वक्तव्य कपोलकल्पित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडबोरी येथील गोंडवाना महासंमेलनात माना समाजाला आरक्षण मिळू देणार नाही, असे कपोलकल्पित विधान आपल्या तोंडी टाकण्याचा प्रयत्न हे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उभे केलेले विरोधकांचे षडयंत्र आहे. मी माना किंवा धनगर समाजाचा नेहमीच सन्मान करतो. असे असताना धादांत खोटे वृत्त पसरविणाऱ्यांवर आपण कायदेशिर कारवाई करणार, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.ज्या माना समाजाच्या नवख्या उमेदवाराला आपण एबी फॉर्म देऊन आरमोरी नगर परिषदेच्या नगराध्यपदी विराजमान केले, याच माना समाजाच्या कृष्णा गजबे यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेचे तिकीट देण्यासाठी आपण शिफारस केली, त्या माना समाजाबद्दल असे वक्तव्य आपण कसे करू शकतो? असा सवाल त्यांनी केला. वास्तविक त्या दिवशीच्या गोंडवाना संमेलनात प्रास्ताविक करणाºयाने आपल्याला उद्देशून केलेल्या भाषणात माना, धनगर समाजाचे आदिवासी आरक्षणावर अतिक्रमण होत असल्याचा मुद्दा छेडला होता. त्यावर उत्तर देताना आपण माना समाजाला आधीच कोर्टाने संरक्षण दिले असल्याने मीच नाही तर सरकारसुद्धा माना समाजाचे आरक्षण नाकारू शकत नसल्याचे भाषणात सांगितले. असे असताना आपण जे बोललोच नाही ते वक्तव्य आपल्या तोंडी टाकून संन्याशाला फाशी देण्याचा केविलवाना प्रयत्न विरोधकांनी करणे दुर्दैवी असल्याचे खा.नेते म्हणाले. या पत्रपरिषदेला भाजपचे पदाधिकारी सुधाकर येनगंधलवार, न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, डॉ.भरत खटी, आनंद श्रृंगारपवार, रमेश भुरसे, प्रशांत वाघरे, विलास दशमुखे आदी उपस्थित होते.