शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या मोर्चाची कोरची तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:00 IST

तालुका काँग्रेस कमिटी, आदिवासी विद्यार्थी संघ व गोटूल सेना कोरचीच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, पालक, विद्यार्थी, बेरोजगारांचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांविरोधात घोषणा देण्यात आल्या.

ठळक मुद्देशेकडो शेतकरी व शेतमजुरांचा सहभाग : मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुका काँग्रेस कमिटी, आदिवासी विद्यार्थी संघ व गोटूल सेना कोरचीच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, पालक, विद्यार्थी, बेरोजगारांचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांविरोधात घोषणा देण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, योग्य हमीभाव द्यावा. कोरची तालुक्यात प्रलंबित असलेले सामूहिक, वैयक्ति वनहक्क दावे त्वरित द्यावे. शेतकºयांना शेतीसाठी कर्ज उपलब्ध करावे. प्रलंबित असलेला तेंदूपत्ता बोनस त्वरित द्यावा. पेट्रोल व डिझेलची दरवाढ कमी करावी. राफेल घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. मागील वर्षी तुडतुडा पिकामुळे नुकसान झाले. त्याची मदत द्यावी, आदिवासी जनतेवर लावलेले ११० कलम मागे घ्यावे. ओबीसी प्रवर्गाला १९ टक्के आरक्षण द्यावे, अनुसूची पाच लागू करावी. झेंडेपार येथे प्रस्तावित असलेला प्रकल्प रद्द करावा. भारतीय संविधान जाळणाºयांवर कठोर कारवाई करावी. कुमकोठ येथील देवस्थानाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. टिपागड अभयारण्य रद्द करून धार्मिक स्थळ म्हणून घोषित करावे. डीबीटी योजना बंद करून पंडित दीनदयाल व स्वयंरोजगार योजनेची रक्कम द्यावी. जिल्हा निवड समिती लागू करावी, या मागण्यांसाठी कोरची तहसीलवर धडक देण्यात आली. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले.आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, माजी आ.आनंदराव गेडाम, पं.स.सभापती कचरी काटेंगे, जि.प.सदस्य अनिल केरामी, सुमित्रा लोहंबरे, प्रल्हाद कराडे, माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, माजी जि.प.उपाध्यक्ष जीवन नाट, काँग्रेस तालुकाध्यक्ष श्यामलाल मडावी, देसाईगंज तालुकाध्यक्ष परसराम टिकले, कुरखेडा तालुकाध्यक्ष जयंत हरडे, काँग्रेस कमिटी तालुका समन्वयक मनोज अग्रवाल, मुकेश नरोटे, श्रावण मातलावार, हकीम शेख, जगदीश कपुरडेरिया, प्रेमिला काटेंगे, नगरसेविका हर्षलता भैसारे, सुमन घाटघुमर, वशित शेख, नसरूद्दीन भामानी, सरपंच नरपतसिंग नैताम, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष राहुल अंबादे, परवेश लोहंबरे, बाबुराव मडावी, धनराज मडावी आदींनी नेतृत्व केले.

टॅग्स :Morchaमोर्चाcongressकाँग्रेस