शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

नोटबंदीविरोधात काँग्रेसचा एल्गार

By admin | Updated: January 7, 2017 01:24 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० व एक हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला.

 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे : शेकडो कार्यकर्ते उपस्थित गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० व एक हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर देशोधडीला लागले आहे. हा निर्णय पूर्णत: फसला असून या निर्णयाचा निषेध करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, निरिक्षक कैसर अहेमद, जि.प.चे उपाध्यक्ष जीवन पा. नाट, माजी जि.प. अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, काँगसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, पंकज गुड्डेवार, युवक काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, गडचिरोली तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, जिल्हा परिषद सदस्य मनोहर पा. पोरेटी, शांताबाई परसे, सुखमाबाई जांगधुर्वे, धानोरा पं.स.च्या सभापती कल्पना वड्डे, पं.स. सदस्य जस्वदाबाई करंगामी, शेवंताबाई हलामी, चामोशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश भांडेकर, वैभव भिवापूरे, काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, नंदू वाईलकर, पांडुरंग घोटेकर, प्रभाकर वासेकर, सुभाष धाईत, कुणाल पेंदोरकर, एनएसआयुचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, श्रीनिवास दुल्लमवार, छबिलाल बेसरा, एजाज शेख, आरीफ कनोजे, बाशिद शेख, निशांत नैताम, मिलींद किरंगे, गौरव अलाम, राकेश रत्नावार, कमलेश खोब्रागडे, निलीमा राऊत, अपर्णा खेवले, लता ढोक, विनोंद धंदरे, रवींद्र शहा, उमेश पेडुकर, जयंत हरडे, परसराम टिकले, आरीफ खानानी, मनोहर पोरेटी, राजू जीवानी, राजेश ठाकूर, विनोद भोयर, निळकंठ निखाडे, श्रीकांत सुरजागड, वैशाली सातपुते, आशिष कन्नमवार, रोहिणी मसराम, मिलिंद बागेसर, हेमंत भांडेकर आदीसह जिल्हाभरातील हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतमालाचे भाव झपाट्याने घसरले असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहे. उद्योग, व्यापारात मंदी आली असून अनेक तरूणांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहे. केंद्र सरकारने विदेशातून काळा पैसा आणण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. मात्र त्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना नोटबंदीच्या निर्णयामुळे बँकेच्या रांगेत उभे राहण्याची पाळी आली आहे, असा आरोप काँग्रेसने यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने यावेळी केली. काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे नेते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. काँग्रेसच्या आंदोलनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सरकार विरोधात फलक काँग्रेसने झळकावले. (जिल्हा प्रतिनिधी) काँग्रेसची सरकारकडे मागणी नोटबंदीमुळे बँकेच्या रांगेत उभे राहून मृत्यू पावलेल्या नागरिकांना प्रत्येकी २५ लाख नुकसान भरपाई देण्यात यावी, नोटबंदीमुळे लोकांनी जे रूपये जमा केले आहे. त्यावर १८ टक्के व्याज देण्यात यावे, ज्या प्रमाणे उद्योगपतीचे कर्ज माफ केले, त्याच प्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्यात यावा, उद्योजक व दुकानदार यांना आयकर टॅक्स व सेल टॅक्समध्ये ५० टक्के सूट देण्यात यावी.