शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राकाँकडून विजयाचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:22 IST

राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. सदर तीनही राज्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत आहे.

ठळक मुद्देमुलचेरा, आष्टीतही आनंद : तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मारली बाजी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. सदर तीनही राज्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत आहे. फटाके फोडून व मिठाई वाटून या विजयाचा जल्लोष काँग्रेस, युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी करण्यात आला.गडचिरोली - जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयाचा जल्लोष फटाके फोडून मंगळवारी साजरा करण्यात आला. सदर विजय हा काँग्रेस कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला मोठी चपराक आहे, असे मत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी युकाँचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, पंकज गुड्डेवार, हसनअली गिलानी, समशेर खॉ पठाण, अमोल भडांगे, जि. प. सदस्य मनीषा दोनाडकर, रवींद्र शाहा, राजू जिवानी, श्रीनिवास दुलमवार, प्रल्हाद कऱ्हाडे, प्रभाकर तुलावी, मुस्ताक हकीम, नंदू खानदेशकर, उमेश पेटूकर, रेमजी भैसारे, वसंत राऊत, दिवाकर मिसार, ढिवरू बारसागडे, मिलींद किरंगे, तौफिक शेख, गौरव अलाम, राकेश गणवीर यांच्यासह युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.आष्टी - आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काँग्रेस कमिटीच्या वतीने फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस संजय पंदीलवार, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य नाना पसपूलवार, आनंद कांबळे, ग्राम पंचायत सदस्य शंकर मारशेट्टीवार, प्रफुल पंदीलवार, सुशील अवसरमोल, नितेश अमलपुलीवार, रमेश जुनारकर, रमेश सोमनकर, आनंद दुर्गे, बंडू चापले, राहुल डांगे, मेश्राम, कटरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सिरोंचा - येथील बसस्थानक चौक, एकता चौक, मानेवर वॉर्ड आणि कोत्तागुडम येथे फटाके फोडून तसेच स्थानिक बसस्थानक चौकात मिठाई वाटप करून काँग्रेसतर्फे तीन राज्यातील विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे युवा नेता आकाश परसा, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष कौसर खान, अहेरी विधानसभा सचिव लक्ष्मण मेकला, नगरसेवक बबलू पाशा, मंगेश जाधव, राकेश गडपेलीवर, माजित अली, नागेश काळकोटा यांच्यासह काँग्रेस युवा कार्यकर्ते उपस्थित होते.मुलचेरा - येथील नेताजी चौकात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीन राज्यातील विजयाचा जल्लोष साजरा केला. याशिवाय जिल्ह्याच्या अन्य शहरी व ग्रामीण भागात विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.

टॅग्स :Electionनिवडणूकcongressकाँग्रेस