शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

पं.स.वर काँग्रेसचाच वरचष्मा

By admin | Updated: March 15, 2017 01:54 IST

गडचिरोली जिल्ह्यातील १२ पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली.

तीन पं.स.वर भाजपचे वर्चस्व : आरमोरीत काँग्रेस शिवसेनेसोबत तर मुलचेरात भाजपसोबत गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील १२ पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांवर काँग्रेसचे तर तीन पंचायत समित्यांवर भाजप व दोन पंचायत समित्यांवर राकाँचे सभापती विराजमान झाले आहेत. अहेरी पंचायत समिती आविसंने राखली असून भामरागड पंचायत समितीवर अपक्षांनी कब्जा केला आहे. काँग्रेसने कोरची, कुरखेडा, आरमोरी, मुलचेरा, गडचिरोली या पंचायत समित्यांवर यश मिळविले आहे. तर भाजपने देसाईगंज, धानोरा व चामोर्शी या पंचायत समित्यांवर कब्जा केला आहे. तर एटापल्ली, सिरोंचा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व ठेवले आहे. कोरची पं.स.मध्ये काँग्रेसच्या कचरीबाई प्रेमलाल काटेंगे सभापती पदी ईश्वरचिठ्ठीने निवडून आल्या तर उपसभापती पदी श्रावणकुमार शिवरूराम मातलाम हे ही ईश्वरचिठ्ठीने निवडून आले. चार सदस्यसंख्या असलेल्या या पंचायत समितीमध्ये काँग्रेसला दोन, भाजपला एक व शिवसेनेला एक जागा मिळाली आहे. ईश्वरचिठ्ठीने निवड झाली व काँग्रेसला दोन्ही जागा मिळाल्या. कुरखेडा पंचायत समितीच्या सभापती पदावर काँग्रेसचे गिरीधारी तितराम तर उपसभापती पदावर मनोज दुनेदार सहा विरूध्द चार मतांनी निवडून आले. काँग्रेसचे येथे १० पैकी ६ सदस्य असून पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. सभापती पदाच्या निवडणुकीत गिरीधारी तितराम यांनी अपक्ष श्रीराम दुगा यांचा सहा विरूध्द चार मतांनी पराभव केला तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे मनोज दुनेदार यांनी भाजपचे बौध्दकुमार लोणारे यांचा दोन मतांनी पराभव केला. पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार अजय चरडे यांनी काम पाहिले. पं.स.वर काँग्रेसचा झेंडा फडकताच शहरातून विजयी रॅली काढण्यात आली. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयंत हरडे, जि.प.चे उपाध्यक्ष जीवन नाट, देसाईगंजचे तालुका अध्यक्ष परसराम टिकले, नगरसेवक आरिफ खानानी, निताराम कुमरे, आनंदराव जांभुळकर, तुकाराम मारगाये, दामोधर वट्टी, बबलु शेख, निजाम शेख, नगरसेवक उस्मान पठाण, मनोज सिडाम, ताहेर मुगल आदी उपस्थित होते. देसाईगंज पंचायत समितीवर सहाही सदस्य भाजपचे निवडून आले आहेत. त्यामुळे येथे सभापतीपदी मोहन गायकवाड तर उपसभापती पदी गोपाळ उईके अविरोध निवडून आले. यावेळी आमदार क्रिष्णा गजबे, मोतीलाल कुकरेजा, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, राजू जेठाणी आदी उपस्थित होते. आरमोरी येथे सभापती पदी काँग्रेसच्या बबीता उसेंडी तर उपसभापती पदी शिवसेनेचे यशवंत सुरपाम निवडून आलेत. आठ सदस्य संख्या असलेल्या आरमोरी पंचायत समितीमध्ये काँग्रेस चार, भाजपा तीन व शिवसेना एक असे संख्याबळ आहे. मंगळवारी येथे पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. काँग्रेसकडून सभापती पदासाठी बबीता उसेंडी यांनी तर भाजपाकडून सभापती पदासाठी रूपमाला वट्टी यांनी नामनिर्देशनपत्र सादर केले. यात काँग्रेसच्या बबीता उसेंडी यांना पाच मते मिळाली तर भाजपच्या रूपमाला वट्टी यांना तीन मते मिळाल्याने सभापती पदी काँग्रेसच्या बबीता उसेंडी निवडून आल्या. उपसभापती पदासाठी शिवसेनेचे यशवंत सुरपाम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसभापती पदी अविरोध निवड झाली. आरमोरी पंचायत समितीवर काँग्रेस व शिवसेनेने एकत्र येऊन आपला झेंडा फडकविला आहे. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार मनोहर वलथरे यांनी काम पाहिले. यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, तालुका अध्यक्ष किशोर वनमाळी, आनंदराव आकरे, बबुजी ताडाम, लक्ष्मी मने, वेणू ढवगाये, श्रीनिवास आंबटवार, प्रा. शशीकांत गेडाम, सुभाष सपाटे, मेघा मने, तुळशीदास काशीकर, उदाराम सहाकाटे, दत्तू सोमनकर, राम मने, हारेंद्र भजभुजे, मोहन भुते, रवी चापले, रवीेंद्र खेवले आदी उपस्थित होते. गडचिरोली पंचायत समितीत सभापती पदी काँग्रेसच्या दुर्लभा कैलाश बांबोळे यांची अविरोध निवड झाली. त्या एकमेव पात्र उमेदवार होत्या. तर रासपकडून निवडून आलेले विलास केशवराव दशमुखे यांची भाजपच्या पाठींब्याने उपसभापती पदी निवड झाली. उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जान्हवी तुळशीदास भोयर व विलास केशव दशमुखे यांनी अर्ज दाखल केले होते. दशमुखे यांना सहा तर भोयर यांना तीन मते मिळाली. एक सदस्य अनुपस्थित राहिला. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या चामोर्शी पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपचे आनंद भांडेकर तर उपसभापती पदी आकुर्लीबाई बिश्वास यांची निवड झाली. सभापती पदासाठी भाजपचे आनंद भांडेकर व काँग्रेसचे शंकर आक्रेडीवार यांनी अर्ज भरला होता. आनंद भांडेकर यांना सर्वाधिक १३ मते मिळाली तर आक्रेडीवार यांना पाच मते मिळाली. भांडेकर विजयी झालेत. उपसभापती पदाच्या निवडणुकीत आकुर्लीबाई दुलाल बिश्वास यांना १३ तर काँग्रेसच्या धर्मशीला प्रमोद साखरे यांना पाच मते मिळाली. भाजपच्या आकुलीबाई बिश्वास या विजयी झाल्या. शिवसेनेचा एक व रासपच्या दोन सदस्यांनी काँग्रेसच्या बाजुने मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अरूण येरचे यांनी काम पाहिले. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार एस. आर. तनगुलवार व प्रविण आदे यांनी सहकार्य केले. निवडणुकीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, निवडणूक निरिक्षक प्रमोद पिपरे, डॉ. भारत खटी, स्वप्नील वरघंटे, प्रकाश गेडाम, दिलीप चलाख, रोशनी वरघंटे माधवी पेशेट्टीवार, केशव भांडेकर, मनमोहन बंडावार, दिलीप चलाख, माणिक कोहळे, अतुल भिरकुंडवार, प्रकाश सातपुते,