शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Nagar panchayat election result 2022; गडचिराेलीत काँग्रेस ‘नंबर वन’; नऊ नगर पंचायतींचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 20:48 IST

Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्यातील ९ नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात सर्वाधिक ३९ जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या. त्याखालोखाल भाजपला ३६ जागा मिळाल्या.

ठळक मुद्दे३९ जागांवर विजयभाजपची पीछेहाट, शिवसेनेच्या जागा वाढल्या

गडचिरोली : जिल्ह्यातील ९ नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात सर्वाधिक ३९ जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या. त्याखालोखाल भाजपला ३६ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने २६ जागा पटकावल्या तर, शिवसेनेने १४ जागी विजय मिळविला. या निकालात काँग्रेसने सर्वाधिक जागा पटकावल्या असल्यातरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ३ आणि भाजपने सर्वाधिक १२ जागा गमावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसलाही गेल्यावेळच्या तुलनेत ६ जागा कमी मिळाल्या. दुसरीकडे शिवसेनेच्या २ जागा वाढल्या. स्थानिक संघटना असलेल्या आदिवासी विद्यार्थी संघाचे प्राबल्य वाढले असून त्यांच्या उमेदवारांनी तब्बल २० जागी विजय मिळवत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. गेल्यावेळी आदिवासी विद्यार्थी संघाकडे केवळ ४ जागा होत्या. ४ वरून २० अशी मुसंडी त्यांनी मारली.

काँग्रेस पक्षाने काही महिन्यांपूर्वीच संघटनात्मक बदल करत युवा चेहऱ्यांना संधी दिली. ना. विजय वडेट्टीवार यांनीही शक्य तितका वेळ देत काँग्रेसची बाजू सावरली; अन्यथा काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता होती. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी स्पष्ट बहुमत केवळ धानोरा या एकाच ठिकाणी मिळाले. सिरोंचा नगर पंचायतीत आदिवासी विद्यार्थी संघ, कुरखेडा येथे काँग्रेस तर मुलचेरा नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भामरागड, अहेरी, एटापल्ली, चामाेर्शी, काेरची नगर पंचायतीत स्पष्ट बहुमत कुणालाच मिळाले नाही. त्यामुळे तळ्यात-मळ्यात अशी स्थिती असून तेथे सत्ता स्थापन करण्यासाठी जाेरदार घमासान हाेण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक