शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
7
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
8
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
9
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
10
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
11
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
12
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
13
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
14
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
15
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
16
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
17
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
18
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
19
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
20
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?

जिल्हा कचेरीवर काँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2015 02:01 IST

शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षीत बेरोजगार व सर्वसामान्यांच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोलीच्या वतीने ....

सरकारविरोधी रोष रस्त्यावर : शेतकरी, शेतमजुरांच्या न्याय हक्कासाठी गडचिरोली : शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षीत बेरोजगार व सर्वसामान्यांच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोलीच्या वतीने गुरूवारी येथील इंदिरा गांधी चौकातून काढण्यात आलेला विशाल मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला. या मोर्चात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षीत बेरोजगार युवक सहभागी झाले होते. ट्रॅक्टर व बैलबंडीवर काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्त्व काँग्रेसचे विधानसभा उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी केले. येथील इंदिरा गांधी चौकात काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी व शेतमजूर दुपारी १ वाजता गोळा झाले. त्यानंतर १.१५ वाजता ट्रॅक्टर व बैलबंडीवर निघालेला मोर्चा १.४५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचला. या मोर्चात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेश कुमरे, काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख विनोद दत्तात्रय जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, प्रदेश सचिव हसनअली गिलानी, माजी जि.प. अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, ज्येष्ठ नेते रवींद्र दरेकर, अ‍ॅड. राम मेश्राम, पं.स. सभापती देवेंद्र भांडेकर, कल्पना वड्डे, शामिना उईके, पं.स. उपसभापती चंदू वडपल्लीवार, रहिम शेख, नंदू वाईलकर, नरेंद्र भरडकर, प्रभाकर वासेकर, समशेर खॉ पठाण, सतिश विधाते, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, काशिनाथ भडके, पांडुरंग घोटेकर, युवक काँग्रेसचे गडचिरोली विधानसभा अध्यक्ष अतुल मल्लेलवार, राकेश रत्नावार, वैभव भिवापुरे, नितेश राठोड, राजू गारोदे, देवाजी सोनटक्के, सी. बी. आवळे, सुनिल खोब्रागडे, लता पेदापल्ली, महेंद्र ब्राह्मणवाडे, मनिष डोंगरे, जि.प. सदस्य सुकमा जांगधुर्वे, शांता परसे, नगरसेविका लता मुरकुटे, पुष्पा कुमरे, नंदू कायरकर, शरद मुळे, करूणा गणवीर, शंकरराव सालोटकर, किशोर वनमाळी, विलास ढोरे, राजेश ठाकूर, मेहबूब अली, मुक्तेश्वर गावडे, मनोहर पोरेटी, रवींद्र शहा, जि.प. सदस्य केशरी उसेंडी, बंडू शनिवारे, विनोद खोबे, माजी पं.स. सभापती पी. आर. आकरे, अमिता मडावी आदीसह काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार युवक सहभागी झाले होते. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मोर्चाला संबोधित केल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल गाडे यांना दिले. आंदोलनादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (स्थानिक प्रतिनिधी)या आहेत प्रमुख मागण्याशेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, धानाला प्रती क्विंटल ३ हजार ५००, कापसाला प्रती क्विंटल सात हजार व सोयाबिनला प्रती क्विंटल चार हजार रूपये भाव देण्यात यावा, आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या धानाचे शेतकऱ्याचे थकलेले १२ कोटी २८ लाख रूपयांचे चुकारे तत्काळ द्यावे, दुबार पेरणीसाठी बी -बियाणे व खतांचा मोफत पुरवठा करावा, सुधारित केंद्रीय भूमीअधिग्रहण कायदा रद्द करावा, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, रखडलेल्या सिंचन प्रकल्पाला निधी उपलब्ध करून काम पूर्ण करावे, महिला व बाल रूग्णालय सुरू करावे, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, ओबीसी विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमाकरिता १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, गडचिरोली जिल्हा विकास प्राधिकरणाला मंजुरी देऊन ते कार्यान्वित करावे.