शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या बैलबंडी मोर्चाची तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:34 IST

आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकरी व शेतमजुरांच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी माजी आमदार आनंदराव गेडाम...

ठळक मुद्दे माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या मुख्य नेतृत्वात आरमोरी तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकरी व शेतमजुरांच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या मुख्य नेतृत्वात आरमोरी तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढला. शेकडो शेतकºयांच्या उपस्थितीत मागण्यांचे निवेदन तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले.आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करून शेतकºयांना एकरी २५ हजार रूपये तत्काळ मदत द्यावी. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, कर्जमाफीसाठी लावलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात, धानाला प्रती क्विंटल ४ हजार ५०० रूपये भाव द्यावा, पेट्रोल डिझेल व गॅसची दरवाढ कमी करावी, शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, गरीब शेतकरी, शेतमजूर यांना स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ, साखर, रॉकेल व डाळीचा पुरवठा करावा आदी मागण्यांसाठी आरमोरी येथील स्थानिक राममंदिरातून मोर्चाला सुरूवात झाली. शेकडो बैलबंड्या शेतकºयांसह तहसील कार्यालयावर धडकल्या.मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार आनंदराव गेडाम, काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, आरमोरी विधानसभा प्रभारी डॉ. योगेंद्र भगत, पं.स. सभापती बबीता उसेंडी, जि.प. सदस्य वनिता सहाकाटे, मनिषा दोनाडकर, किशोर वनमाळी, विश्वास भोवते, बग्गुजी ताडाम, परसराम टिकले, जि.प. सदस्य प्रभाकर तुलावी, प्रा. शशिकांत गेडाम, राजीव गारोदे, कुरखेडा पं.स. सभापती गिरीधर तितराम, दौलत धुर्वे, जयंत हरडे, डॉ. मेघराज कपूर, नगरसेवक आरीफ खानानी, सुभाष सपाटे, केशव गेडाम, आनंदराव आकरे, वृंदा गजभिये, प्रभाकर टेंभुर्णे, मंगला कोवे, दीपक बेहरे, तुळशीदास काशीकर, मिलिंद खोब्रागडे, दिलीप घोडाम, चंदू वडपल्लीवार, समशेर खॉ. पठाण, विश्वेश्वर दर्रो यांनी केले.