शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

गडचिरोलीत ग्रामसभांच्या दोन-दोन बँंक खात्यांमुळे निर्माण झाला संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:01 IST

वनहक्क कायद्यांतर्गत मालकी हक्क प्राप्त झालेल्या कोरची व कुरखेडा तालुक्यातील १९ ग्रामसभांच्या जंगलातून विद्युत टॉवरलाईन गेल्यामुळे झालेली नुकसानभरपाई ग्रामसभांना देण्यात आली. संबंधित ग्रामसभांनी ती रक्कम ग्रामकोष समितीच्या नियमित बँक खात्यात न टाकता ग्रामसभा सनियंत्रण समितीच्या बँक खात्यात टाकली.

ठळक मुद्देप्रशासन म्हणते हे नियमबाह्य १९ ग्रामसभांची खाती सील करण्याचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वनहक्क कायद्यांतर्गत मालकी हक्क प्राप्त झालेल्या कोरची व कुरखेडा तालुक्यातील १९ ग्रामसभांच्या जंगलातून विद्युत टॉवरलाईन गेल्यामुळे झालेली नुकसानभरपाई ग्रामसभांना देण्यात आली. संबंधित ग्रामसभांनी ती रक्कम ग्रामकोष समितीच्या नियमित बँक खात्यात न टाकता ग्रामसभा सनियंत्रण समितीच्या बँक खात्यात टाकली. मात्र ही बाब नियमबाह्य असल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी १९ ग्रामसभांची बँक खाती सील केली. दुसरीकडे प्रशासनाची ही कृती अन्यायकारक असल्याचे सांगत ग्रामसभांनी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे धाव घेतली आहे.कोरची तालुक्यातील मुरकुटी, मलायघाट, लेकुरबोडी, पडियालजोब, बोदालदंड, बिजेपार, बेलारगोंदी, आंबेखारी, डाबरी, कुकडेल, गहाणेगाटा, झनकारगोंदी, टेमली, दवंडी, गडेली, चिलमटोला तसेच कुरखेडा तालुक्यातील सोनपूर, आंधळी, येडापूर या १९ ग्रामसभांना सामूहिक वनहक्क प्राप्त झालेल्या जंगलातून २०१८-१९ मध्ये विद्युत टॉवर लाईन उभारण्यात आली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कटाई करण्यात आली. त्यापोटी कंत्राटदाराकडून मिळणारी नुकसानभरपाईची रक्कम ग्रामसभांना द्यावी अशी मागणी ग्रामसभांनी एसडीओमार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली होती. ती मागणी सिंह यांनी मान्य केली. पण त्यासाठी खाते क्रमांक देताना तो ग्रामकोष समितीचा नियमित खाते क्रमांक न देता ग्रामसेवक किंवा कोणी सरकारी प्रतिनिधीचा समावेश नसलेला ग्रामसभा सनियंत्रण समितीचा खाते क्रमांक देण्यात आला. त्या खात्यात पैसेही जमा झाले. मात्र ग्रामकोष समितीऐवजी दुसºया खात्यात पैसे जमा करणे नियमबाह्य असल्याची तक्रार प्रशासनाकडे आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी करून ती खाती सील करण्यास सांगितले.सध्या तेंदूपत्ता हंगाम सुरू असून तेंदूपत्त्याचे आर्थिक व्यवहार ग्रामसभेच्या खात्यातूनच होत असल्याने सदर खाते सुरू होणे आवश्यक आहे, असे ग्रामसभांचे म्हणणे आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ग्रामसभांनी ग्रामकोष समितीच्या नियमित खात्यातून व्यवहार करावा, असा सल्ला दिला आहे.

प्रत्येक ग्रामसभेला मिळाले ७० ते ७५ लाखविद्युत टॉवर लाईनसाठी झाडे कापल्याचा मोबदला म्हणून १९ ग्रामसभांना प्रत्येकी ७० ते ७५ लाख रुपये मिळाले आहेत. ग्रामसभा आपला निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असली तरी ग्रामसेवकाला डावलून कोणताही निर्णय घेता येत नाही. याशिवाय ग्रामसभेसमोर प्रत्येक व्यवहाराचा हिशेब ठेवावा लागतो. पण सदर नुकसानभरपाईच्या रकमेबद्दल संबंधित ग्रामसेवकांनी अनभिज्ञता दर्शविली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी समिती गठीतदरम्यान या व्यवहाराची शहानिशा करून १९ ग्रामसभांनी काढलेले नवीन बँक खाते योग्य की अयोग्य हे तपासण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चौकशी समिती गठीत केली. त्या समितीचा अहवाल जर ग्रामसभांच्या बाजुने आला तर सील केलेली खाती लगेच मोकळी केली जाईल, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.नुकसानभरपाई रक्कम ज्या बँक खात्यांमध्ये टाकली ती खाती ग्रामसभेच्या ठरावानुसारच ग्रामसभा सनियंत्रण समितीच्या नावाने बनविलेली आहेत. समितीमधील दोन सदस्यांना त्यात व्यवहाराचे अधिकार ग्रामसभांनी दिले आहे. ग्रामसभेची सर्व मिळकत त्याच खात्यात जमा होते. असे असताना ते खाते अनधिकृत कसे काय? याबाबत प्रशासनाने संभ्रम दूर करावा.- डॉ.सतीश गोगुलवार, मार्गदर्शक, ग्रामसभा,कोरची-कुरखेडा

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना