शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मृत गाईंच्या आकड्यात गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

गाई मरण पावल्या असल्या तरी किती गायी मरण पावल्या आणि किती विकण्यात आल्या याचा नेमका आकडा पशुसंवर्धन विभागाकडे नाही. विशेष म्हणजे मरण पावलेल्या गाईंपैकी २३ डिसेंबरपर्यंत केवळ ७ गाईंचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे उर्वरित २३९ गायींपैकी नेमक्या किती गाई मरण पावल्या याचा आकडा अजूनही गुलदस्त्यात आहे. यात बºयाच गायी मरण पावल्याचा देखावा करून प्रत्यक्षात त्या तेथून लांबवल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देकेवळ सात गाईंचे शवविच्छेदन : मरण पावल्याच्या नावावर परस्पर विकल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने आरमोरीजवळील शिवणी येथे ठेवलेल्या फ्रिजवाल गाईंपैकी दोन महिन्यात तब्बल २४६ गाई गायब झाल्या आहेत. त्यापैकी काही गाई मरण पावल्या असल्या तरी किती गायी मरण पावल्या आणि किती विकण्यात आल्या याचा नेमका आकडा पशुसंवर्धन विभागाकडे नाही. विशेष म्हणजे मरण पावलेल्या गाईंपैकी २३ डिसेंबरपर्यंत केवळ ७ गाईंचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे उर्वरित २३९ गायींपैकी नेमक्या किती गाई मरण पावल्या याचा आकडा अजूनही गुलदस्त्यात आहे. यात बºयाच गायी मरण पावल्याचा देखावा करून प्रत्यक्षात त्या तेथून लांबवल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीला पुण्यावरून ३८३ गायी-वासरे मिळाली होती. वाहतुकीदरम्यान त्यातील १५ गायी आणि १६ वासरे मरण पावली. दि.१२ ते १४ ऑक्टोबर यादरम्यान त्या गायी आरमोरीत दाखल झाल्या, त्यावैळी ३५२ गाई-वासरे जिवंत होती. १४ डिसेंबरला जनावरांची मोजणी केली त्यावेळी २७६ गाई आणि १० वासरे अशी २८६ जनावरे जिवंत होती. त्यानंतर दि.२४ डिसेंबरला शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष गाई ताब्यात घेतल्या त्यावेळी केवळ १०६ गाई उपलब्ध होत्या.आरमोरीत जिवंत आणण्यात आलेल्या ३५२ गाईंपैकी केवळ १०६ गायी उपलब्ध झाल्यामुळे उर्वरित २४६ गायींचे नेमके काय झाले? हे जाणून घेणे शेतकऱ्यांसोबतच प्रशासनासाठीही महत्त्वाचे झाले आहे. मात्र याबाबत आरमोरीचे तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.किशोर पराते यांना विचारले असता दोन दिवसांपूर्वीपर्यंत आपण ७ गाईंचे शवविच्छेदन केले असल्याचे ते म्हणाले. उर्वरित मृत गाईंचे शवविच्छेदन का झाले नाही? असे विचारले असता गाई मरण पावल्याची माहिती आपल्याला कंपनीकडून दिलीच जात नव्हती, तिथे काम करणारे लोक दोन दिवसांनंतर गाई मरण पावल्याचे सांगत होते. त्यामुळे त्या गायींची आधीच परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याने शवविच्छेदन होऊ शकले नसल्याचे डॉ.पराते म्हणाले.वास्तविक हा सर्व प्रकार संशयास्पद असून गायी खरोखर किती मेल्या आणि किती गायब केल्या गेल्या (विकल्या) याची सखोल चौकशी करावी आणि ही गडबड करणाºयांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली जात आहे.दरम्यान जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतर कंपनीने विकलेल्या काही गाई परत आणण्यात आल्या आहेत.लाखोंच्या गाईंची किंमत कोणाकडून वसूल करणार?लष्कराच्या दुधाळू फ्रिजवाल गायींची किंमत शासनाच्या नोंदी प्रतिगाय ४० हजार रुपये असली तरी प्रत्यक्षात ती गाय ५० ते ६० हजार रुपये किमतीची आहे. परंतू जवळजवळ फुकटात मिळालेल्या कोटीच्या घरातील गायींची प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीने योग्य देखभाल केलीच नाही. त्यांना ठेवण्यासाठी शेडही बनविले नाही. खाण्यास योग्य प्रकारे चाराही दिला नाही. परिणामी अनेक गायी मरण पावल्या. लाखो रुपये किमतीच्या या शासनाच्या गायी मरण्यासाठी आणि त्यांच्या गायब होण्यासाठी जबाबदार धरून त्या गायींची किंमत प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीकडून वसूल करणार का? किंवा त्या कंपनीवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कायदेशिर कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कुपोषणामुळेच गाईंचे मरणज्या गाई मरण पावल्या त्या कुपोषणामुळेच मरण पावल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. याचा अर्थ कंपनीने त्यांची योग्य देखभाल केली नाही हे स्पष्ट आहे. गाई शेतकºयांच्या ताब्यात देण्याच्या आधीच मरण पावणे किंवा गायब होणे यासाठी सर्वस्वी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीच जबाबदार असल्याने त्या कंपनीवर कायदेशिर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :cowगाय