शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांशी भांडण; युवतीने प्राशन केले कीटकनाशक, उपचारादरम्यान मृत्यू 

By गेापाल लाजुरकर | Updated: December 9, 2024 20:30 IST

करुणा पोचमलू निर्ला (२०) रा. कमलापूर, असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे.

गडचिरोली : युवती व आई-वडिलांमध्ये घरगुती कारणावरून भांडण झाले. तेव्हा आईने मीच विष पिऊन मरते, अशी धमकी मुलीला दिली. याचवेळी रागाच्या भरात मुलीने कीटकनाशक प्राशन केले. ह्या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना अहेरी तालुक्याच्या कमलापूर येथे रविवार, ८ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. 

करुणा पोचमलू निर्ला (२०) रा. कमलापूर, असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. कमलापूर येथील निर्ला कुटुंबात करुणा हिचे आई-वडिलांशी भांडण झाले. भांडण अधिकच विकोपाला गेले. तेव्हा आईने मीच विष प्राशन करून मरते, अशी धमकी मुलीला दिली. आईने बोलल्याचे शब्द मुलीच्या मनाला बोचले. नंतर तिने रागाच्या भरात कीटकनाशक प्राशन केले. 

शेतातील पिकांवर फवारणी करण्यासाठी पावसाळ्यात हे कीटकनाशक आणलेले होते. यापैकी काही शिल्लक होते. मुलीने विष प्याल्याची बाब काही वेळानंतर कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तिला कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले; परंतु येथे कार्यरत असलेले दोन्ही वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. 

येथील रुग्णवाहिकासुद्धा दुरुस्तीसाठी गडचिरोली येथे पाठविली होती. तेव्हा प्रभारी वैद्यकीय अधिकारी राजेश मानकर यांच्याशी काही लोकांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यानंतर त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी वाहन उपलब्ध करून दिले. ताेपर्यंत बराच उशीर झाला. करुणाला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; परंतु उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

‘पीएचसी’मध्ये उपचार झाला असता तर वाचला असता जीवकमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी आहेत. एकातरी वैद्यकीय अधिकाऱ्याने २४ तास उपलब्ध असावे, असा नियम आहे; परंतु रविवारी दोन्ही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते. त्यामुळे करुणावर वेळीच उपचार झाला नाही. वेळेवर उपचार झाला असता तर करुणाचा जीव वाचला असता, असा आरोप करीत सरपंच श्रीनिवास पेंदाम यांनी डॉक्टरांची वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली