शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी खरीप पिकांची स्थिती समाधानकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत धानाची स्थिती सर्वसाधारण चांगली होती. हलके धान परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पाऊस कहर करीत आहे. त्यामुळे १५ दिवसांचा कालावधी उलटूनही अनेकांनी धान कापले नाही. कापलेल्या धानाच्या कडपा बांधितच कुजत आहेत. वादळवाऱ्यामुळे जड धान कोसळून पडले आहे. त्यामुळे याही धानाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे.

ठळक मुद्देपीक पाहणी अहवाल : सर्वच तालुक्यांमधील पैसेवारी ५० च्या वर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महसूल व कृषी विभागाने आॅक्टोबर महिन्यात केलेल्या पाहणीत पीक परिस्थिती समाधानकारक असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची पैसेवारी ६७ पैसे आढळून आली आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे १ लाख ७७ हजार ८८१ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने धानाचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. यावर्षी सुरूवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने धानपिकाची स्थिती चांगली आहे. रोगराई सुद्धा कमी प्रमाणात आहे. राज्यभरातील खरीप पिकांची नेमकी स्थिती कशी आहे, याचा अंदाज येण्यासाठी सप्टेंबर महिन्यात नजर अंदाज पैसेवारी काढली जाते. याला हंगामी पैसेवारी सुद्धा असे म्हटले आहे. या पैसेवारीचा अहवाल १ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाला. यामध्ये जिल्ह्यातील खरीप पिकांची पैसेवारी सरासरी ६९ टक्के आढळून आली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पाहणी करण्यात आली. त्यामध्ये पिकांची स्थिती थोडी कमकुवत आढळून आली. त्यामुळे सरासरी पैसेवारी ६७ टक्के दाखविण्यात आली आहे. विशेष म्हणजे १२ ही तालुक्यातील पैसेवारी ५० टक्केपेक्षा अधिक आढळून आली आहे. ५० टक्केपेक्षा अधिक उत्पादन झाल्यास पीक परिस्थिती सर्वसाधारण चांगली असल्याचा अंदाज शासनाकडून वर्तविला जाते. ५० टक्केपेक्षा अधिक पैसेवारी असल्यास संबंधित जिल्हा किंवा तालुक्याला शासनाकडून दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले जात नाही. कृषी विभाग व महसूल विभागाने केलेल्या पाहणीत सर्वाधिक चांगली पिकांची स्थिती देसाईगंज तालुक्यातील असल्याचे म्हटले आहे. या तालुक्याची पैसेवारी ७६ दाखविण्यात आली आहे. तर भामरागड तालुक्यातील पैसेवारी सर्वात कमी ५७ एवढी दाखविण्यात आली आहे.परतीच्या पावसामुळे अंतिम पैसेवारी घटण्याची शक्यताऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत धानाची स्थिती सर्वसाधारण चांगली होती. हलके धान परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पाऊस कहर करीत आहे. त्यामुळे १५ दिवसांचा कालावधी उलटूनही अनेकांनी धान कापले नाही. कापलेल्या धानाच्या कडपा बांधितच कुजत आहेत. वादळवाऱ्यामुळे जड धान कोसळून पडले आहे. त्यामुळे याही धानाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. सुरूवातीपासून जवळपास अडीच महिने पाऊस पडला. त्यामुळे सोयाबीन, कापूस पिकाचीही वाढ खुंटली आहे. काही कपाशीचे पीक पाण्यामुळे कुजून गेले. नोव्हेंबर महिन्यात पिकांची अंतिम पाहणी केली जाणार आहे व त्याचा अहवाल १ डिसेंबर रोजी प्रकाशित केला जाणार आहे. या अंतिम पाहणीत पैसेवारी घटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती