शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेतीअभावी रखडली काँक्रीट रस्त्यांची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:00 IST

गडचिरोली शहरात २०१७-१८ या वर्षात १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. यातून सात सिमेंट काँक्रीटचे मार्ग व एक डांबरी मार्ग मंजूर केला आहे. २०१८-१९ मध्ये प्राप्त १५ कोटी रुपयांच्या निधीमध्ये ३२ कामे हाती घेतली आहेत. यातील १९ कामे सुरू झाली आहेत. तर १३ कामे अजुनही सुरू झाली नाहीत.

ठळक मुद्देघाटांचे लिलाव झालेच नाही : वर्ष उलटूनही कामांना सुरूवात नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरात विविध योजनांतर्गत सुमारे ३० कोटी रुपयांची रस्त्याची कामे मंजूर आहेत. यातील काही रस्ते सिमेंट काँक्रीटचे आहेत. सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनविण्यासाठी रेती हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र पावसाळ्याला सुरूवात झाली असतानाही यावर्षी अजूनपर्यंत रेती घाटांचे लिलाव झाले नाही. रेती मिळत नसल्याने सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे रखडली आहेत.मागील वर्षीपासून रेतीच्या घाटांना परवानगी देण्याचे अधिकार राज्यस्तरीय समितीकडे सोपविले आहेत. राज्यस्तरीय समितीचे रेती घाट मंजुरीकडे दुर्लक्ष होत असल्याने रेती घाटांचे लिलाव वेळेवर होत नाही. जवळपास डिसेंबर महिन्यापासून बांधकामांना सुरूवात होते. त्यामुळे रेती घाटांची लिलाव किमान मार्च ते एप्रिल या कालावधीत होणे आवश्यक आहे. दोन वर्षांच्या पूर्वी जिल्हास्तरीय समितीकडे रेती घाटांना परवानगी देण्याचे अधिकार होते. त्यावेळी रेती घाटांचे लिलाव मार्च-एप्रिल महिन्यातच आटोपत होते. मात्र मागील वर्षीपासून राज्यस्तरीय समितीकडे अधिकार सोपविल्याने रेती घाटांचे लिलाव होण्यास विलंब होत आहे. यावर्षी आता पावसाळ्याला सुरूवात झाली असतानाही अजूनपर्यंत रेती घाटांचे लिलावच झाले नाहीत.गडचिरोली शहरात २०१७-१८ या वर्षात १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. यातून सात सिमेंट काँक्रीटचे मार्ग व एक डांबरी मार्ग मंजूर केला आहे. २०१८-१९ मध्ये प्राप्त १५ कोटी रुपयांच्या निधीमध्ये ३२ कामे हाती घेतली आहेत. यातील १९ कामे सुरू झाली आहेत. तर १३ कामे अजुनही सुरू झाली नाहीत.यातील काही कामे खडीकरण, डांबर व सिमेंट काँक्रीटचे आहेत. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात रेतीची आवश्यकता भासते. चोरीची रेती महाग राहते. तसेच कंत्राटदाराला बिल काढतेवेळी रेतीच्या टीपी सुध्दा जोडाव्या लागतात. चोरी करणारे टीपी देत नाही. त्यामुळे चोरीच्या रेतीने बांधकाम करणे कंत्राटदाराला कठीण होत असल्याने अनेकांनी रस्त्यांचे काम थांबविले असल्याचे दिसून येते.चोरीची रेती पोहोचली सात हजार रुपयांवरमध्यंतरी महसूल विभागाच्या तालुकास्तरीय पथकाने मोहीम उघडून रेती चोरणाऱ्या २० पेक्षा अधिक ट्रॅक्टर जप्त केल्या. त्यानंतर रेती चोरीची मोहीम थंडावली आहे. महसूल विभाग पुन्हा मोहीम सुरू करेल, या भितीमुळे रेती चोरण्याची हिंमत रेती तस्कर करीत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी रेतीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. याचा गैरफायदा काही निवडक रेती तस्करांकडून घेतला जात असून सात हजार रुपये ब्रास दराने रेतीची विक्री केली जात आहे. यामुळे एवढी महागडी रेती खरेदी करताना घर बांधकाम करणाऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडत आहे. रेती घाटांचा लिलाव न झाल्याने शासनाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे.रस्त्यांची दुरवस्थाइंदिरानगरातील मुख्य मार्ग सिमेंट काँक्रीटचा बनविण्याचे मंजूर आहे. सदर कंत्राटदाराने एक महिन्यापूर्वी रस्त्यावरचे डांबर जेसीबीच्या सहाय्याने काढून फेकले. त्यामुळे रस्त्यावर गिट्टी पसरली आहे. नागरिकांची ओरड सुरू झाल्यानंतर १५ दिवसांपूर्वी मुरूम आणून टाकला. मात्र तो पसरविला नाही. त्यामुळे रस्त्यावरची गिट्टी कायम आहे. तसेच अनेक ठिकाणी खड्डेही पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये आता पाणी साचत आहे. तसेच रस्त्यावर चिखल निर्माण झाला आहे. रस्ता बांधकामाला विलंब होता तर जुना डांबरी रस्ता का खोदला, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्याबाबत नगर परिषदेने आदेश द्यावे, अशी मागणी आहे. शहरातील इतरही रस्त्यांचे हेच हाल आहेत.

टॅग्स :sandवाळू