गडचिरोली : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या तीनही विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोटाचा वापर मतदारांनी केला. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात १७ हजार ५१० मतदारांनी नोटाचा वापर केला. तर आरमोरी विधानसभा क्षेत्रात ४ हजार १६२ मतदारांनी नोटा वापरला. तर अहेरी विधानसभा क्षेत्रात ७ हजार ३४९ मतदारांनी नोटाला पसंती दर्शविली. अहेरी विधानसभा क्षेत्रात नोटा या पर्यायाला मतदारांनी संमिश्र प्रतिसाद दिला.आरमोरी विधानसभा क्षेत्रात १ लाख ७२ हजार ८५८ जणांनी मतदान केले. यापैकी १ लाख ७२ हजार २३३ मते ईव्हीएम मशीनमार्फत झाली. तर ६२५ मते पोस्टल स्वरूपात झाली. आरमोरी विधानसभा क्षेत्रात नोटाच्या स्वरूपात २१ पोस्टल मते झाली. या विधानसभा क्षेत्रात एकूण ४ हजार १६२ जणांनी नोटाचा वापर केला. अहेरी विधानसभा क्षेत्रात नोटा पर्यायाला मतदारांनी संमिश्र प्रतिसाद दिला. या विधानसभा क्षेत्रात पोस्टल स्वरूपात केवळ आठ जणांनी नोटा पर्यायाचा वापर केला. ईव्हीएम व पोस्टलसह ७ हजार ३४९ जणांनी नोटाचा वापर केला. अहेरी विधानसभा क्षेत्रात अहेरी शहरात १०५ जणांनी नोटाचा वापर केला. तर आलापल्ली येथे ११० जणांनी नोटाचा वापर केला. एटापल्ली शहरातील ४ मतदान केंद्रावर ११० जणांनी नोटाचा वापर केला. तर भामरागड येथील २ मतदान केंद्रावर अनुक्रमे १६, १९ अशा एकूण ३५ जणांनी नोटाचा वापर केला. मुलचेरा येथील एकमेव मतदान केंद्रावर ११ जणांनी नोटा वापरला. अहेरी विधानसभा क्षेत्रात रंगय्यापल्ली येथील मतदान केंद्रावर सर्वाधिक १३४ जणांनी नोटाला पसंती दर्शविली. एकूणच अहेरी विधानसभा क्षेत्रात गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या तुलनेत नोटाचा वापर अतिशय कमी झाला. तालुक्यातील दुर्गम भागात मतदानाची टक्केवारीही अतिशय चांगली होती. पोलीस व निवडणूक विभागाच्या जनजागृतीमुळे मतदानासाठी नागरिक सरसावले होते. (शहर प्रतिनिधी)
अहेरीत नोटाला संमिश्र प्रतिसाद
By admin | Updated: October 25, 2014 22:40 IST