शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

प्रधान सचिवांनी साधला आदिवासींशी संवाद

By admin | Updated: June 21, 2014 23:57 IST

आदिवासी विकास विभागाचे प्रधानसचिव मुकेश खुल्लर यांनी आज शनिवारी आलापल्ली व भामरागड येथे दौरा केला. दरम्यान त्यांनी भामरागड येथील तहसील कार्यालयात आदिवासी नागरिकांशी संवाद

विविध समस्या जाणल्या : प्रकाश आमटे यांच्याशीही केली चर्चाभामरागड : आदिवासी विकास विभागाचे प्रधानसचिव मुकेश खुल्लर यांनी आज शनिवारी आलापल्ली व भामरागड येथे दौरा केला. दरम्यान त्यांनी भामरागड येथील तहसील कार्यालयात आदिवासी नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. यावेळी प्रधान सचिव मुकेश खुल्लर यांनी भामरागड येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांशी आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांबाबत चर्चा केली. तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत प्रधान सचिव मुकेश खुल्लर यांनी दुभाषिकाच्या सहाय्याने आदिवासी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी घरकूल, शिक्षण, आरोग्य, कृषी याबाबत सोयीसुविधांची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी आदिवासी सेवक सब्बर मोगल बेग यांनी प्रकल्प कार्यालयातील रिक्त पदांमुळे विभागाच्या शासकीय योजना आदिवासींपर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचा प्रश्न उपस्थित केला. आदिवासी नागरिकांच्या विविध समस्याही मांडल्या. यावर प्रधान सचिव मुकेश खुल्लर यांनी राज्यपालाने ९ जून रोजी एक नवा आदेश पारित केला असून या आदेशानुसार आदिवासी विकास विभागातील तसेच तालुकास्तरावरील अन्य अधिकाऱ्यांचे पदे भरण्यात येणार असल्याचे सांगितले. हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देऊन कार्यप्रणाली जाणून घेतली. यावेळी त्यांनी समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्याशी आदिवासी नागरिकांच्या समस्यांबाबत चर्चा केली.यावेळी आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त (शिक्षण) विनोद पाटील, मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी, गडचिरोलीच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी अण्णाबत्तुला, भामरागडचे प्रकल्प अधिकारी सोनकवडे, भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ठाकूर, भामरागडचे वनपरिक्षेत्राधिकारी खोब्रागडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)