शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल तारण कर्ज योजना सुरू

By admin | Updated: March 20, 2017 01:31 IST

धानाच्या काढणी हंगामानंतर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात शेतमाल शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणल्यामुळे शेतमालास योग्य बाजारभाव मिळत नाही.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : कृषी विभागाचे आवाहन गडचिरोली : धानाच्या काढणी हंगामानंतर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात शेतमाल शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणल्यामुळे शेतमालास योग्य बाजारभाव मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत सुलभ शेतमाल तारण कर्ज योजना राबविली जात आहे. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शेतमालाच्या काढणी हंगामानंतर शेतकऱ्यांकडील धान्याचा साठा ज्या प्रमाणात कमी होतो त्या प्रमाणात शेतमालाचे बाजारभाव वाढतात. मात्र याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापारी घेतात. शेतमालाच्या उतरत्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तसेच सुगीच्या कालावधीत व पुढील टप्प्यात शेतमालाचे बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. शेतमालाचे बाजारभाव कोसळत असताना किमान आधारभूत किमतीच्या आधारे शेतकऱ्यांना सदर तारण कर्ज देऊन त्यांना दिलासा देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सदर तारण कर्ज योजनेत तूर, मूग, उडीद, सोयाबिन, सूर्यफूल, चना, धान, करडई, ज्वारी, बाजरी, मका, काजू, बेदाणा व हळद आदी शेतमालाचा समावेश आहे. सदर कर्ज योजनेसाठी पणन मंडळाने ५० कोटी रूपयांची तरतूद केली असून ही योजना राबविण्यासाठी ८३ बाजार समित्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी) शेतमालानुसार कर्जाची मुदत व व्याजदर सोयाबिन, तूर, मूग, उडीद, चना, धान, करडई, सूर्यफूल, हळद आदी शेतमालाच्या बाजारभावानुसार एकूण किमतीच्या ७५ टक्के रक्कम अथवा किमान आधारभूत किमतीपेक्षा बाजारभाव कमी होत असल्यास आधारभूत किमतीनुसार होणाऱ्या रक्कमेच्या ७५ टक्के रक्कम अशी कर्ज वाटपाची मर्यादा आहे व या कर्जाची मुदत सहा महिने असून व्याजदरही सहा टक्के आहे. ज्वारी, बाजरी, मका व गहू या शेतमालाच्या बाजारभावानुसार ५० टक्के अथवा ५०० रूपये प्रती क्विंटल यापैकी कमी असणारी रक्कम कर्ज स्वरूपात मिळणार आहे. याचा व्याजदर सहा टक्के आहे. काजू बी व बेदाणा या शेतमालाच्या तारण कर्जाची मुदत सहा महिने असून व्याजदरही सहा टक्के ठेवण्यात आला आहे.