शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
2
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
3
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
4
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
5
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
6
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
7
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
8
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
9
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
10
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
11
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
12
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
13
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
14
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
15
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
16
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
17
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
18
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
19
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
20
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'

वैद्यकीय महाविद्यालयासाठी समिती करणार अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 6:00 AM

मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करता येईल किंवा नाही याबाबतचा अहवाल शासनाला सादर करावे, असे निर्देश दिले आहेत. अहवाल सादर करण्यासाठी संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबईने प्रा.डॉ.राजेंद्र सुरपाम यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेऊन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देहालचालींना वेग : फेब्रुवारीमध्ये सादर करणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा गडचिरोली येथे उपलब्ध आहेत काय, याची शहाानिशा करण्यासाठी समिती गठित करण्यात आली. सदर समिती प्रत्यक्ष गडचिरोली येथे येऊन अभ्यास करणार आहे व त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे.गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल आहे. जिल्ह्यात कुपोषण, रक्तक्षय, मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. तसेच खासगी रुग्णालयांची संख्या कमी आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची आर्थिक क्षमता येथील नागरिकांमध्ये नाही. त्यामुळे गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आणून दिला. मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करता येईल किंवा नाही याबाबतचा अहवाल शासनाला सादर करावे, असे निर्देश दिले आहेत. अहवाल सादर करण्यासाठी संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबईने प्रा.डॉ.राजेंद्र सुरपाम यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेऊन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असणे आवश्यक आहे. येथील मातामृत्यू, बालमृत्यू, कुपोषण, गरिबी आदी परिस्थिती लक्षात घेता वैद्यकीय महाविद्यालयाची गरज आहे. शासकीय महाविद्यालय होण्यासाठी जवळपास सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय मिळण्यासाठी केवळ आता राजकीय इच्छाशक्तींनी अधिक जोर लावण्याची गरज व्यक्त होत आहे.आवश्यक असणाऱ्या बहुतांश सुविधा उपलब्धवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी किमान ५०० खाटांचे रुग्णालय ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात २०० ते जिल्हा सामान्य रुग्णालयात २८६ खाटा आहेत. एकूण ४८६ खाटा उपलब्ध होतात. त्यामुळे खाटांचा प्रश्न उद्भवणार नाही. वैद्यकीय महाविद्यालयासाठी जवळपास २५ एकर जागा आवश्यक आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागूनच वनविभागाची सेमानापर्यंत ५० एकरपेक्षा जास्त जागा उपलब्ध आहे. वनविभागाने ही जागा उपलब्ध केल्यास जागेचीही अडचण भासणार नाही. तसेच वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेले विविध विभाग सुद्धा गडचिरोली रुग्ण्णालयात उपलब्ध आहेत. त्यामुळे समितीचा अहवाल सकारात्मक राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीय