शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

देसाईगंज नगर पालिकेच्या गैरकारभाराची आयुक्तांकडून दखल

By admin | Updated: July 7, 2015 01:19 IST

देसाईगंज नगर परिषदेत नगरोत्थान (जिल्हास्तरीय) योजनेतील झालेल्या कामाची अनियमितता व गैरव्यवहाराबाबत ...

१२ मुद्यांवर मागितला खुलासा मुख्याधिकाऱ्यास दिले आदेश देसाईगंज : देसाईगंज नगर परिषदेत नगरोत्थान (जिल्हास्तरीय) योजनेतील झालेल्या कामाची अनियमितता व गैरव्यवहाराबाबत प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन नागपूर तथा आयुक्त अनुपकुमार यांनी दखल घेतली असून या प्रकरणी सर्व अनियमिततेविषयी सात दिवसांच्या आत खुलासा सादर करावा, अन्यथा मुख्याधिकाऱ्याविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आदेश मुख्याधिकारी विनोद जाधव यांना पत्राद्वारे दिले आहे. त्यामुळे देसाईगंज नगर पालिकेत प्रचंड खळबळ उडाली आहे. सत्ताधारी भाजपच्या हाती असलेल्या देसाईगंज नगर पालिकेत १२ विकास कामांमध्ये निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार होऊन नगर पालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याच्या तक्रारी आयुक्त कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. गडचिरोली जिल्हाधिकारीमार्फत चौकशी केली असता, प्रभाग क्रमांक २ लाखांदूर-वडसा टी पार्इंट ते ब्रह्मपुरी रस्त्यावरील कब्रस्थान आमगाव रस्त्यापर्यंत राज्य मार्गावर रस्ता दुभाजकाचे काम, प्रभाग क्रमांक २ लाखांदूर-वडसा टी पार्इंट ते मुरली राईसमीलपर्यंत रस्ता दुभाजकाचे काम कंत्राटदारसोबत झालेल्या करारनाम्यातील अट क्रमांक १ प्रमाणे महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्राच्या अधिन राहून कंत्राटदारास कामाचे आदेश देण्यात येईल व नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास काम रद्द समजण्यात येईल व ते कंत्राटदारावर बंधनकारक राहिल. या बाबींमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाहरकत गृहीत धरून अवैधरित्या निविदा काढण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याविषयी नाहरकत प्रमाणपत्र द्यायला नकार दिल्यावर काम रद्द न करता विद्युत पोल उभारण्याचे सामान नगर पालिकेला दिले व ते स्वीकारून कंत्राटदारास रक्कम अदा करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार बेकायदेशीर आहे. हा प्रकार आर्थिक अनियमितेत मोडतो. तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम (विद्युत विभाग) यांनी केलेल्या तपासणी करारनाम्यानुसार निविदेप्रमाणे सामानाचा पुरवठा करणे आवश्यक होते. परंतु नगर पालिकेला प्राप्त झालेल्या स्ट्रीटलाईटबाबत करारनामा भंग झाल्याचे दिसून येते. आदी सर्व प्रकाराबाबत आयुक्तांनी मुख्याधिकाऱ्यास खुलासा मागितला आहे. आता या प्रकरणाकडे तक्रारकर्त्यासह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. (वार्ताहर)