शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोचीनारा ग्रामपंचायतीने मिळवले आयएसओ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 05:00 IST

जिल्हा मुख्यालयापासून १२० किमी लांब असलेल्या नक्षलग्रस्त, डोंगराळ व दुर्गम भागातील पेसा ग्रामपंचायत असलेल्या कोचीनाराने आयएसओ मानांकन पटकावले आहे. हा बहुमान पटकावणारी तालुक्यातील पहिली, तसेच नवीन आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. यापूर्वी या ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार, महाआवास अभियान पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये आता आयएसओ मानांकनाची भर पडली आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : जिल्हा मुख्यालयापासून १२० किमी लांब असलेल्या नक्षलग्रस्त, डोंगराळ व दुर्गम भागातील पेसा ग्रामपंचायत असलेल्या कोचीनाराने आयएसओ मानांकन पटकावले आहे. हा बहुमान पटकावणारी तालुक्यातील पहिली, तसेच नवीन आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. यापूर्वी या ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार, महाआवास अभियान पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये आता आयएसओ मानांकनाची भर पडली आहे. दिनांक ४ मे २०२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालय कोचीनारा येथे आएसओ मानांकन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर आयएसओ लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, तर प्रमुख अतिथी म्हणून कोरचीचे तहसीलदार छगनलाल भंडारी, गटविकास अधिकारी राजेश फाये, काँग्रेसचे जिल्हा महासचिव मनोज अग्रवाल, मुख्याध्यापक शालिक कराडे, आशिष अग्रवाल, बेतकाठीच्या सरपंच कुती हुपुंडी, नागपूरचे आयएसओ ऑडिटर विनोद कोल्हे व शुभम मारबते, सरपंच सुनीता मडावी, उपसरपंच रुपराम देवांगण, ग्रामसेवक दामोदर पटले, पोलीस पाटील श्रावण घावडे, ग्रामसेवक संघटनेने विभागीय उपाध्यक्ष प्रदीप भांडेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.गटविकास अधिकारी राजेश फाये यांनी ग्रा.पं.ला शुभेच्छा देत तालुक्यातील इतरही ग्रामपंचायतींनी कोचीनाराचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. सरपंच सुनीता मडावी यांनी ग्रामसेवक दामोदर पटले यांच्या मागदर्शनाने व सर्व सदस्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पुढेही गावाच्या विकासासाठी कार्य करत राहू, असे सांगितले. या कार्यक्रमासाठी ग्रा.पं.चे सर्व पदाधिकारी, ग्रामस्तरीय सर्व कर्मचारी, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक यांनी परिश्रम घेतले. संचालन हिरामन मेश्राम, तर आभार उपसरपंच रुपराम देवांगण यांनी मानले.

स्वप्न पूर्ण, आता दर्जाही टिकविणारप्रास्ताविकात ग्रामसेवक दामोदर पटले यांनी ग्रामपंचायतीचा जलद गतीने विकास होण्यासाठी ग्रामपंचायत आयएसओ करणे माझे स्वप्न होते, ते आज प्रत्यक्षात साकारले. त्यासाठी ग्रा.पं.चे सर्व पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतली. ग्रामपंचायतचा हा आयएसओ दर्जा टिकवणे, गतिमानता व लोकाभिमुख कार्य करणे हे आमचे कर्तव्य असून आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही दिली.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत