शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा महावितरणच्या अभियंत्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:29 IST

गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतजमिनी कोरड्या पडल्या आहेत. परिणामी धानपीक धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत मोटारपंपाने पाणीपुरवठा करून धानपीक वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहेत.

ठळक मुद्देपाणीपुरवठ्यासाठी धडपड : सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतजमिनी कोरड्या पडल्या आहेत. परिणामी धानपीक धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत मोटारपंपाने पाणीपुरवठा करून धानपीक वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. मात्र कुरखेडा तालुक्याच्या आंधळी व सावलखेडा भागात गेल्या आठ दिवसांपासून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे वीज मोटारपंप जळाले. शिवाय पाणीपुरवठ्याच्या कामात अडचणी येत आहेत. महावितरणच्या वतीने कुठलेही भारनियमन न करता सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कुरखेडा येथील महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांना बुधवारी घेराव केला.२४ तासाच्या आत आंधळी भागात व तालुक्यात सुरळीत वीज पुरवठा करावा, अन्यथा शिवसेना कुरखेडाच्या वतीने महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा शिवसैनिकासह संतप्त शेतकºयांनी दिला आहे. कुरखेडाच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख डॉ.महेंद्रकुमार मोहबंशी, तालुका प्रमुख आशिष काळे, कामगार सेना जिल्हा प्रमुख नरेंद्र तिरनकर, दशरथ लाडे, विजय पुस्तोडे, दिगांबर नाकाडे, लोमेश कोटांगले, मुजाहिद शेख, केशव भोडे, विठोबा लाकडे, रवींद्र कऱ्हाडे, आसाराम देवारे, रतिराम कºहाडे, विनायक जांभुळकर, तुलाराम टेंभूर्णे, भास्कर कुसाम, भारत जांभुळकर, लक्ष्मण कऱ्हाडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, कुरखेडा तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. या भागातील ७० टक्के लोकांची उपजीविका शेती व्यवसायावर अवलंबून आहे. यंदाही शेकडो शेतकऱ्यांनी धानपिकाची लागवड केली आहे. धानपीक ऐन गर्भात असताना पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे कृत्रिमरित्या पाणीपुरवठा करण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. तालुक्यातील आंधळी, नवरगाव, सोनेरांगी, कऱ्हाडी, सावलखेडा आदीसह लगतच्या गावांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून महावितरणच्या वतीने कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे.विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे वीज पंपही जळाले आहे. परिणामी पाण्याअभावी शेतकºयांचे धानपीक करपण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.