शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गावातील टिल्लूपंप बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:02 IST

फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभापासूनच गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मागील दहा वर्षांपासून दर उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होत असताना स्थानिक प्रशासनाने कोणती उपाययोजना केली,.........

ठळक मुद्देवैरागडची ग्रामसभा गाजली : फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईची समस्या

ऑनलाईन लोकमतवैरागड : फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभापासूनच गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मागील दहा वर्षांपासून दर उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होत असताना स्थानिक प्रशासनाने कोणती उपाययोजना केली, असा प्रश्न उपस्थित करीत गावातील टिल्लूपंप बंद करावे, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान गावातील पाणी समस्येबरोबरच इतरही प्रश्नांवर ग्रामसभा चांगलीच गाजली.वैरागड येथे उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्यां पाणी टंचाई समस्येच्या निवारणासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना कार्यक्रमांतर्गत गोरजाई डोहावर पाणीपुरवठा योजना २०१३ मध्ये कार्यान्वित करण्यात आली. परंतु या योजनेची अद्यापही अंमलबजावणी झाली नाही. या योजनेनुसार नवीन पाणीपुरवठा विहीर व फिल्टरेशन गॅलरी, नवीन गृहपंप, नवीन पाईपलाईन, गावात नवीन वितरण व्यवस्था आदींचा समावेश होता. परंतु नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी कुठे मुरले हे समजण्या पलिकडचे होते. नवीन पाणीपुरवठा योजनेची फाईल मंत्रालयात असल्याचे राष्टÑीय ग्रामीण पेयजल योजनेचे अधिकारी सांगतात. ही योजना रखडण्यास संबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.सध्या चालू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचे गावात समान वितरण होत नाही. याला कारण नळधारक आहेत. अनेक कुटुंबात विद्युत टिल्लूपंप वापरले जात असल्याने इतर कुटुंबांना पिण्याचेही पाणी मिळत नाही. त्यामुळे ज्यावेळेत नळ योजनेचा पाणीपुरवठा सुरू असतो. त्यावेळी विद्युत पुरवठा बंद ठेवण्याचा ठराव घेण्यात आला. यावेळी सरपंच गौरी सोमनानी, उपसरपंच श्रीराम अहीरकर, ग्रा. पं. सदस्य नलिनी आत्राम, नलिनी सहारे, माधुरी बोडणे, संगीता धनकर, पोलीस पाटील गोरखनाथ भानारकर, अतुल मेश्राम, मुनेश्वर मडावी, सुमन खरवडे, राजू आकरे, सुरेंद्र बावनकर, नामदेव धनकर उपस्थित होते.गाळ उपसाची  चौकशी करणारतत्कालीन ग्रामविकास अधिकारी डाखरे यांच्या कार्यकाळात न्यायालयातील गाळ उपसणे व फेकणे या कामाकरिता ३ लाख ६९ हजारांचा खर्च झाला. तरी एका ट्रॅक्टर मालकाचे ५० हजार रूपये देणे बाकी आहे. परंतु उपसलेला गाळ मात्र गायब आहे. याची चौकशी करणार, असे सचिव एन. ए. घुटके यांनी सांगितले.