शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

पांदण रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:37 IST

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वैरागड परिसरातील गावांमध्ये पांदण रस्त्यांचे काम करण्यात आले आहे. मात्र या कामांकडे ग्रामपंचायतींनी दुर्लक्ष केल्याने या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यात होतो चिखल : अनेक ठिकाणी शेतीचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वैरागड परिसरातील गावांमध्ये पांदण रस्त्यांचे काम करण्यात आले आहे. मात्र या कामांकडे ग्रामपंचायतींनी दुर्लक्ष केल्याने या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.दुरूस्तीच्या कामाचे मूल्य २० हजार रूपयांपेक्षा अधिक असल्यास कामाच्या ठिकाणी संबंधित कामाबाबतचे लोखंडी फलक लावणे आवश्यक आहे. मात्र अनेक पांदन रस्त्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे फलक लावले नाही. पांदण रस्ता बनविल्यानंतर या रस्त्याची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची असताना वैरागड, सुकाळा, मोहझरी, देलनवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पांदण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक पांदण रस्त्यांचे खडीकरण झाले नसल्याने पावसाळ्यात या रस्त्यांवर चिखल निर्माण होते. परिणामी शेतकरी व नागरिकांना शेताकडे जाण्यास कठीण होत आहे.आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येणाºया देलनवाडी येथे २०१४-१५ या वर्षात लोभाजी अहिरकर ते वसंत घोडमारे यांच्या शेतापर्यंत पांदन रस्ता तयार करण्यात आला. परंतु आजच्या स्थितीत या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वैरागड येथील दादाजी बावणकर ते चूनबोडी रस्त्याचे खडीकरण अजूनपर्यंत झाले नाही. मेंढेबोडी सुकाळा या रस्त्यादरम्यान दोन पांदन रस्ते तयार करण्यात आले. मात्र त्यांचा काहीच उपयोग नाही.वैरागड-आरमोरी मार्गावर पाण्याची टाकी म्हणून ओळखल्या जाणाºया तलावाच्या काठावर दोन शेतकºयांसाठी लाखो रूपये खर्च करून पांदन रस्ता तयार करण्याचे काम प्रशासनाने केले आहे. वैरागड येथील मेघराज भानारकर ते मनोहर बावणकर यांच्या शेतजमिनीच्या हिरापूर येथील पांदन रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.आरमोरी पंचायत समिती अंतर्गत २०१४-१५ ते २०१७-१८ या वर्षात वैरागड, सुकाळा, ठाणेगाव, देलनवाडी येथील पांदन रस्त्याच्या कामाची चौकशी करावी. दोषी अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसचे सचिव राहूल धाईत यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.मुख्य रस्त्यालगतच पांदण रस्ताठाणेगावपासून थोड्याच अंतरावर दोन पांदण रस्ते तयार झाले. या ठिकाणी गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. गरज नसताना डांबरी रस्त्याला लागून अगदी २० फुटावर पांदण रस्ता तयार करण्यात आला.आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वैरागड, सुकाडा, देलनवाडी येथील पांदन रस्ता बांधकामावरील आर्थिक गैरव्यवहार, कामाचा दर्जा, अपूर्ण काम याबाबत आपल्याकडे अजूनपर्यंत तक्रार आली नाही. तक्रार आल्यास त्याची चौकशी केली जाईल.- पी. आर. रायपुरे,विस्तार अधिकारी (पंचायत),पंचायत समिती आरमोरी