उपविभागीय अधिकारी, तथा नगर पंचायतचे मुख्याधिकारी तसेच तहसीलदारांना रोजंदारी सफाई कामगारांनी गुरुवारला निवेदन दिले. यात म्हटले आहे की, कंत्राटदाराकडे दोन महिन्यांचे मानधन बाकी आहे. मानधनाची रक्कम जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहील असे म्हटले आहे. सफाई कर्मचारी कामावर न आल्याने अस्वच्छता पसरली आहे. एटापल्ली शहरासह मुख्य मार्गावर सफाई करून कचरा न उचलल्याने घाण पसरली आहे. निवेदनावर २२ रोजंदारी कामगारांच्या सह्या आहेत. तत्काळ सफाई कर्मचाऱ्यांचे मानधन द्यावे, अशी मागणी भारतीय जनसंवादचे सचिन मोतकुरवार यांनी केले. कंत्राटदारांनी दोन महिन्यांचे वेतन बाकी असल्याचा आरोप फेटाळला असून मी नागपूरवरून मंगळवारला येणार आहे. त्यानंतर तोडगा काढू, असे सांगितले. मात्र नगरपंचायत काय कारवाई करणार याकडे लक्ष आहे.
सफाई कामगार आंदोलनावर, एटापल्लीत घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:38 IST