शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांवर दबावप्रकरणी दुग्धविकासमंत्री जानकर निर्दोष; न.प.निवडणुकीदरम्यानचे प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 11:40 IST

गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील तालुका न्यायालयाने दुग्धविकास मंत्री महादेव जानकर व माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांची मंगळवारी (दि.३०) निर्दोष मुक्तता केली आहे.

ठळक मुद्देव्हिडिओ झाला होता व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील तालुका न्यायालयाने दुग्धविकास मंत्री महादेव जानकर व माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांची मंगळवारी (दि.३०) निर्दोष मुक्तता केली आहे. नगर परिषद निवडणुकीदरम्यान विशिष्ट निवडणूक चिन्ह देण्यासाठी फोनवरून दबाव आणल्याच्या या प्रकरणाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. त्यानंतर जानकर व मोटवानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या देसाईगंज नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान ना.महादेव जानकर यांनी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्या घरून निवडणूक निर्णय अधिकारी दामोदर नान्हे यांना फोन करून प्रभाग ९ ब मध्ये पंजा चिन्ह गोठवून ‘कपबशी’ हे चिन्ह द्यावे असे सांगितल्याचा व्हिडिओ गाजला होता.याबाबत राज्य निवडणूक आयोगाने दखल घेऊन दि.१० डिसेंबर २०१६ ला प्रभाग ९ ब ची निवडणूक रद्द ठरवून जानकर व मोटवानी यांच्याविरूद्ध भादंवि १६६ तसेच भादंवि १८६ कलमानुसार तसेच महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम २२ (६) नुसार देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात जानकर यांनी तीन वेळा देसाईगंज न्यायालयात हजेरी लावली. २९ जानेवारीला अंतिम युक्तीवादादरम्यानही जानकर यांनी न्यायालयात न्यायाधीश के.आर. सिंघेल यांच्यासमोर हजेरी लावली. मंगळवारी सबळ पुराव्याअभावी महादेव जानकर आणि जेसा मोटवानी यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपींच्या वतीने अ‍ॅड.मनोज साबळे नागपूर व अ‍ॅड.मंगेश शेंडे देसाईगंज यांनी तर सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.फुले यांनी काम पाहिले.

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकर